Join us  

#MeToo: १०० कोटी मिळाले तर कुत्र्यासोबत सेक्स करशील का? साजिद खानच्या ‘या’ प्रश्नाने शॉक्ड झाली होती अहाना कुमरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 11:55 AM

‘मीटू’ मोहिमेचे वादळ अद्यापही शमलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून ही मोहिम थंड पडली, असे वाटत असतानाच ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ची हिरोईन अहाना कुमरा हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

मीटू’ मोहिमेचे वादळ अद्यापही शमलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून ही मोहिम थंड पडली, असे वाटत असतानाच ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ची हिरोईन अहाना कुमरा हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, दिग्दर्शक साजिद खानवर तिने गंभीर आरोप केला आहे. याआधीही अनेक महिलांनी साजिदवर लैंगिक गैरतर्वनाचे आरोप केले आहेत. आता अहाना हिनेही साजिदचा खरा चेहरा जगापुढे आणला आहे.

अलीकडे एका मुलाखतीत अहाना बोलत होती. एकदा साजिदने तिला एका चित्रपटावर चर्चा करण्यासाठी आपल्या घरी बोलवले होते. पण या भेटीत जे काही झाले ते धक्कादायक होते. होय, अहानाने मुलाखतीत त्या धक्कादायक घटनेचा खुलासा केला. तिने सांगितले की, ‘चित्रपटावर चर्चा करण्यासाठी साजिदने मला त्याच्या घरी बोलवले होते. मी त्याच्या घरी पोहोचले आणि साजिद मला त्याच्या खोलीत घेऊन गेला. त्या खोलीत बराच अंधार होता. मी तुझ्याबद्दल खूप काही जाणू इच्छितो, असे साजिद मला म्हणाला. या गोष्टी आपण बाहेर बसूनही बोलू शकतो, असे मी त्याला म्हणाले. पण बाहेर आई आहे आणि त्यामुळे आपली चर्चा डिस्टर्ब होऊ शकते, असे तो मला म्हणाला. आम्ही त्याच खोलीत बसलो. पण त्यापूर्वी मी त्याला लाईट सुरु करण्यास सांगितले. साजिदने लाईट आॅन केला. पण लाईट आॅन केल्यावर मला अतिशय विचित्र प्रश्न केला. तुला कुणी १०० कोटी दिलेत तर तू कुत्र्यासोबत सेक्स करशील का? असे त्याने मला विचारले. त्याचा तो प्रश्न ऐकून मी शॉक्ड झाले. तुला मोठ्या चित्रपटात काम करायचे असेल तर अशा घाणेरड्या विनोदांवर हसता यायला हवे,असेही तो मला म्हणाला. केवळ इतकेच नाही तर मी तिथून निघाल्यावर मला त्याचा मॅसेज आला. तू बिकनीत अधिक सुंदर दिसतेय, असे त्याने मॅसेजमध्ये म्हटले होते.’अलीकडे दीया मिर्झानेही साजिदवर टीका केली होती. साजिद हा अतिशय विकृत आणि सेक्सिस्ट पुरूष असल्याचे ती म्हणाली होती.

 

टॅग्स :साजिद खानअहाना कुमरामीटू