Join us

#MeeToo : अनु कपूरचा खुलासा; माधुरी दीक्षितने रेप सीन करण्यास दिला होता नकार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 19:42 IST

जेव्हापासून जगभरात ‘#MeeToo’ या नावाने कॅम्पेन चालविले जात आहे तेव्हापासून विविध देशांमधील मोठमोठ्या सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या लैंगिक शोषणाशी ...

जेव्हापासून जगभरात ‘#MeeToo’ या नावाने कॅम्पेन चालविले जात आहे तेव्हापासून विविध देशांमधील मोठमोठ्या सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या लैंगिक शोषणाशी निगडित घटनांचा खुलासा करीत आहेत. हॉलिवूड निर्माता हार्वे वाइनस्टाइन याच्याविरोधात अनेक दिग्गज अभिनेत्रींनी आवाज उठविल्यानंतर या कॅम्पेनला सुरुवात करण्यात आली. आता बॉलिवूडमध्ये या कॅम्पेनचा परिणाम होताना दिसत असून, अनेक अभिनेत्री त्यांच्याशी घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेचा उघडपणे उल्लेख करताना दिसत आहेत. यापूर्वी इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउच तसेच बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. आपल्याकडे चित्रपटात रेप सीन अतिशय सामान्य पद्धतीने दाखविले जातात. परंतु जर रेप सीन करण्यास एखाद्या अभिनेत्रीचा नकार असेल अन् तरीही तिच्याकडून तो करून घेतला जात असेल तर ते एकप्रकारचे शोषणच असल्याचा सूर आता व्यक्त केला जात आहे. एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता अनु कपूर यांनी नुकताच एका रेडिओवर असा खुलासा केला,  जे वाचून तुम्ही चकित व्हाल. अनु कपूर यांच्या मते, धकधक आणि डान्सिंग गर्ल माधुरी दीक्षित हिच्यावर रेप सीन करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यांनी रेडिओवर म्हटले की त्यावेळी माधुरीला असे काही फोर्स करण्यात आले होते. ज्यामुळे ती रेप सीन करण्यास नकार देऊ शकली नाही. दिग्दर्शकांनी तर अगोदरच स्पष्ट केले होते की, रेस सीन करावाच लागेल.  रेडिओवर अनु कपूरने हे सर्व अतिशय सामान्यपणे सांगितले. मात्र त्यांचा हा खुलासा सोशल मीडियावर लोकांना फारसा भावला नाही. ट्विटरवर जेहरा काजमी नावाच्या यूजर्सने लिहिले की, आज अनु कपूरला एका अभिनेत्रीबद्दल अतिशय वाइट पद्धतीने बोलताना ऐकले. त्यांनी एका चित्रपटात माधुरी दीक्षितला अभिनेता रंजीतसोबत रेप सीन देण्यास भाग पाडले होते असे सांगितले. त्यावेळी दिग्दर्शकांनी स्पष्ट केले होते की, तू हा सीन देण्यास मागे हटू शकत नाही, तुला रेप सीन करावाच लागेल. काजमीने पुढे लिहिले की, अनु कपूरने हा सर्व किस्सा अतिशय सामान्यपणे सांगितले. मात्र यामुळे मला आणि माझ्या मित्रांना खूप त्रास झाला. त्याचबरोबर अनु कपूरविषयी संतापही वाटला. आमचा कॅब ड्रायव्हरही अनु कपूरचा हा सर्व किस्सा रेडिओवर ऐकताना हसत होता. दरम्यान, या यूजर्सच्या ट्विटवर आता इतर यूजर्स रि-ट्विट करून आपला संताप व्यक्त करीत आहेत.