Join us  

मीनाताई ठाकरे यांची भूमिका ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई, अभिनेत्री अमृता रावची प्रांजळ कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 6:00 AM

शांत, सोज्वळ आणि गुणी अभिनेत्री अमृता राव हीने नुकतेच शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यास नमस्कार करून आशीर्वाद घेतला.

२०१९ मधील सर्वांत उत्कंठतावर्धक चित्रपट 'ठाकरे' येत्या २५ जानेवारी ला संपूर्ण जगभरात गरजणार  आहे. करोडो मनांचे मानबिंदू हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखं झणाणतं व्यक्तिमत्त्व रुपेरी पडद्यावर पाहण्याची ओढ सर्वांनाच लागून राहिलेली असल्यामुळे चित्रपटात कोण कोण कलाकारमंडळी झळकणार असल्याची अधिकाधिक माहिती मिळविण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनी दाटून आली आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका खंबीर स्त्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंसारख्या वाघाला मीनाताई ठाकरेंसारख्या धीट, जिद्दी व खंबीर अशा वाघीणीची साथ मिळाली आणि महाराष्ट्राला मातृछाया मिळाली. 'ठाकरे' या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी 'बाळासाहेब ठाकरें'ची भूमिका साकारत असल्याचे आपणा सर्वांस माहितीच आहे. तसेच बाळासाहेबांसारख्या ज्वलंत वादळाला साथ देणाऱ्या ह्या शीतल छायेची भूमिका अभिनेत्री अमृता राव साकारणार असल्याची बातमी बरेच दिवसंपासून चर्चेत आहे. परंतु माँ साहेबांचा मराठमोळा साज असलेल्या वेशात अमृता कशी दिसते हे पाहण्यासाठी आज सायंकाळी शिवजीपार्क येथे लोकांची फार गर्दी झाली होती. 

शांत, सोज्वळ आणि गुणी अभिनेत्री अमृता राव हीने नुकतेच शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यास नमस्कार करून आशीर्वाद घेतला. आजवर सर्वांना आपल्या मायेच्या छायेत सामावून घेणाऱ्या या मातृछायेची कीर्ती खूप ऐकली असली तरी त्यांना प्रत्यक्षात पाहण्याचा योग तसा कमीच आल्यामुळे रुपेरी पडद्यावर मीनाताईंच्या भूमिकेत अमृताला पाहण्यास खरी मजा येणार आहे. 

भूमिकेबद्दल सांगताना अमृता म्हणते की, "जेव्हा निर्माते संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी पहिल्यांदा मला भेटण्यास बोलावले तेव्हा त्यांनी सांगितले की, 'ठाकरे' चित्रपटातील माँसाहेबच्या भूमिकेसाठीच्या शोधाची सुरुवात आणि शेवट तूच आहेस. माझ्या मागील कामांमुळे लोकांमते तयार झालेल्या माझ्या इमेजला पाहता ही भूमिका मला मिळाली. या गोष्टीचा मला फार अभिमान वाटतो कारण, मी नेहमीच माझी स्वतःची ओळख असलेल्या भूमिकांची निवड केलेली आहे. मी या इंडस्ट्रीत स्वतःच्या निवडक कामांमधून स्वतःची ओळख बनवलेली आहे.मी आजवर मला साकारायला मिळालेल्या विलक्षण भूमिकांमुळे स्वतःला खूप नशीबवान समजते. जर का मी आयुष्यात काही कमावलं असेल तर ते म्हणजे मिनाताईंसारख्या व्यक्तित्वाची भूमिका."

तमाम शिवसैनिकांवर सख्या आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या मायमाऊली, वात्सल्यामुर्ती माँसाहेब मीनाताईठाकरेंची मातृछाया अनुभवण्यासाठी संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित 'ठाकरे' येत्या २५ जानेवारी ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार  आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांत्रिक विभागाच्या टीमने ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काम केलेले आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. 

टॅग्स :ठाकरे सिनेमा