Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सिम्बा’वर ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर पडली भारी! पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 19:15 IST

यापूर्वी मानुषीने मालबार दागिण्यांची जाहिरात केली होती. यात ती करिनावर भारी पडली होती. ताज्या जाहिरातीत ती रणवीरवर भारी पडताना दिसतेय

‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर हिच्या बॉलिवूड आगमनाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मानुषीच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा आहेत. मध्यंतरी मानुषीने करण जोहरचा चित्रपट साईन केल्याचीही बातमी होती. पण नंतर असे काहीही नसल्याचे खुद्द मानुषीनेचं जाहिर केले होते. पण चित्रपट नसले तरी अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये मानुषी दिसू लागली आहे. होय, काही दिवसांपूर्वी मानुषी व करिना कपूर या दोघी एका जाहिरातीत दिसल्या होत्या. आता मानुषी रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. अर्थात एका जाहिरातीत. या जाहिरातीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. 

या व्हिडिओत रणवीर व मानुषीची केमिस्ट्री जबरदस्त आहे. इतकी जबरदस्त की,त्यांना पाहिल्यानंतर या दोघांच्या जोडीला चित्रपटात पाहण्याची इच्छा अनेकांना अनावर व्हावी.

यापूर्वी मानुषीने मालबार दागिण्यांची जाहिरात केली होती. यात ती करिनावर भारी पडली होती. ताज्या जाहिरातीत ती रणवीरवर भारी पडताना दिसतेय. एकंदर काय बॉलिवूड डेब्यूपूर्वीच मानुषीने बड्या बड्या बॉलिवूड स्टार्सला टक्कर देणे सुरू केले आहे.रणवीर सिंग लवकरच ‘सिम्बा’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याचा ‘गली बॉय’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर  आहे. तर मानुषी सध्या तिच्या शिक्षणावर भर देतेय. ही २० वर्षीय सुंदरी हरियाणाच्या सोनिपतची रहिवाशी आहे. तीन भावंडांमध्ये दुस-या क्रमांकाच्या मानुषीचा जन्म १४ मे १९९७ रोजी झाला. सोनिपतच्या भगत फूल सिंह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ती वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत आहे.  तिने कुचिपुडी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. राजा आणि राधा रेड्डी अशा नामवंत गुरुंकडून तिने या नृत्याचे धडे गिरवले आहेत.

 

 

टॅग्स :मानुषी छिल्लर