Join us  

मनोज वाजपेयीच्या 'बम्बई में का बा' गाण्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 7:30 PM

मनोज वाजपेयीच्या 'बम्बई में का बा' या भोजपुरी गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याच्या चाहत्यांसाठी मनोरंजक स्पर्धेचे आयोजन केले आहे.

अनुभव सिन्हा आणि मनोज वाजपेयी यांच्या नाविन्यपूर्ण सहयोगाने भोजपुरी म्युझिक व्हिडीओ 'बम्बई में का बा’ने जगभरच्या संगीतप्रेमींचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या गाण्याला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद बघता, अनुभव सिन्हा यांनी संगीत आणि डान्स प्रेमींसाठी व विशेष करून मनोज वाजपेयीच्या चाहत्यांसाठी एक मनोरंजक स्पर्धा  सादर करत आहेत. या स्पर्धेमध्ये 'बम्बई में का बा' वर डान्स करणाऱ्या टॉप 10 परफॉर्मन्सेसना अनुभव आणि मनोजद्वारे शॉर्टलिस्ट करण्यात येईल आणि दिग्दर्शक-अभिनेत्याची जोडी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्यासोबत गप्पा मारेल. तसेच, टॉप 100 विजेत्यांना ऑटोग्राफ असलेले टी-शर्ट्स देण्यात येतील.

सोशल मीडियावर या आनंदाच्या बातमीला शेयर करताना अनुभव सिन्हा म्हणाले की, बम्बई में का बा कॉन्टेस्ट अलर्टला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तुमचे व्हिडिओ या गाण्यावर बनवा आणि सोशल मीडिया चॅनेलवर अपलोड करा. मला आणि मनोजला टॅग करा. 

यशस्वी निर्माता-निर्देशक अनुभव सिन्हाद्वारे रचित, निर्मित आणि निर्देशित तसेच, बहुआयामी अभिनेता मनोज वाजपेयीवर चित्रित आधी कधीच न दिसलेल्या अवतारात दिसणार आहे, 'बम्बई में का बा' एक पेप्पी, ऑफबीट भोजपुरी गीत आहे, ज्याला सर्वच स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळत आहेत.

डॉ सागरद्वारे लिखित या ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यामध्ये  प्रवासी श्रमिकांच्या संघर्षावर भाष्य करण्यात आले आहे आणि उत्तम प्रतिसादात ते खूप वायरल होते आहे.

नुकतेच, ते यूट्यूबवर सर्वात जलद 4 मिलियनचा आकडा गाठणाऱ्या गाण्यांपैकी एक बनले आहे.  टी-सीरीजच्या सहयोगाने बनारस मीडियावर्क्सद्वारे निर्मित, 'बम्बई मे का बा' अभिनेता मनोज वाजपेयीवर चित्रित करण्यात आले आहे.

टॅग्स :मनोज वाजपेयी