Join us  

‘तेरी मिट्टी’ चोरीचं निघालं तर मी लिहिणं सोडून देईल...; मनोज मुंतशीर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 10:39 AM

होय, सुप्रसिद्ध लेखक व गीतकार मनोज मुंतशीर सध्या जाम भडकले आहेत. कारण आहे, ‘केशरी’ या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणं.

ठळक मुद्दे2019 मध्ये अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा रिलीज झाला होता.प्रेक्षकांना हा सिनेमा जितका आवडला, तितकीच या चित्रपटाची गाणीही आवडली होती.

सुप्रसिद्ध लेखक व गीतकार मनोज मुंतशीर (Manoj Muntashir )सध्या जाम भडकले आहेत. कारण आहे, ‘केशरी’ (Kesari) या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ (Teri Mitti song) हे गाणं.  होय, मनोज यांचं हे तुफान लोकप्रिय झालेलं गाणं एका पाकिस्तानी गाण्याची कॉपी असल्याचा आरोप होत आहेत. मनोज मुंतशीर यांनी 2005 मध्ये रिलीज झालेलं एक पाकिस्तानी गाणं चोरल्याचा दावा केला जात आहेत. इतकंच नाही याशिवायही अन्य काही गाणी व कविता चोरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अलीकडे त्यांच्यावर ‘मुझे कॉल करना’ ही कविता चोरल्याचा आरोप झाला होता. ही कविता मनोज यांच्या 2018 मध्ये प्रकाशित ‘मेरी फितरत है मस्ताना’मध्ये प्रसिद्ध झाली आहे. चोरीच्या याच आरोपामुळे ते बिथरले आहेत. आता या आरोपावर मुंतशीर यांनी उत्तर दिलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चोरीचा आरोप धुडकावून लावला. जे कुणी माझ्यावर चोरीचा आरोप करत आहेत, त्यांनी एकदा खात्री करून घ्यावी की, पाकिस्तानी गाण्याचा व्हिडीओ ‘केसरी’ रिलीज झाल्याच्या अनेक महिन्यानंतर अपलोड केला गेला आहे. शिवाय, मी हे देखील सांगू इच्छितो की, जे गाणं मी चोरल्याचा आरोप होतोय, ते कुण्या पाकिस्तानी सिंगरने नाही तर आपल्या लोकगायिका गीता रबारी यांनी गायलं आहे. तुम्ही त्यांना कॉल करूनही विचारू शकता. ‘तेरी मिट्टी’ हे गाणं चोरीचं असेल तर मी लिहिणं सोडून देईल, असं ते म्हणाले.

अचानक एकाचवेळी अनेक चोरीचे आरोप का होत आहेत? असा प्रश्न केला असता हा एक कटकारस्थानाचा भाग असल्याचे ते म्हणाले. माझ्यावर चहूबाजुंनी आरोप होत आहेत. कारण मी मुगलांवर एक व्हिडीओ बनवला होता. यात मी मुगलांविरोधात कठोर शब्दांचा वापर केला होता. यात मी मुगलांना ‘लुटारू’ म्हटलं होतं. या व्हिडीओमुळे मला लक्ष्य केलं जातंय. माझ्या व्हिडीओवर आक्षेप असणारे माझ्याशी खुली चर्चा करू शकतात. पण त्यासाठी आपल्या सैन्यदलांसाठी नॅशनल अँथम बनलेल्या एका गाण्याचा अपमान करणे योग्य नाही. माझं गाणं चोरीचं असेल तर मी नेहमीसाठी लिखाण थांबवेल, असंही ते म्हणाले.

2019 मध्ये अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा रिलीज झाला होता.प्रेक्षकांना हा सिनेमा जितका आवडला, तितकीच या चित्रपटाची गाणीही आवडली होती. चित्रपटातील ‘तेरी मिट्टी में घुल जावां’ हे गाणं best track of the yearमध्ये आलं होतं.

टॅग्स :केसरीबॉलिवूड