Join us  

दहा- पंधरा लोकांसाठी संपूर्ण इंडस्ट्री वाईट कशी मनोज वाजपेयीनेही व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 3:12 PM

कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. जया बच्चन यांना टार्गेट केल्यावर कंगनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या टिकेचा सामना करावा लागत आहे.

सुशांत सिंह 'आउटसायडर' होता, त्याचा कुणी 'गॉडफादर' नव्हता, त्याचप्रमाणे 'नेपोटीझम' या कारणामुळे सुशांतने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप झाला.  दरम्यान इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप स्ट्रगल केल्यानंतर नाव कमावले आहे. काहींनी त्यांची कहाणी अनेकदा शेअर केली आहे. अशीच कहाणी आहे अभिनेता मनोज वाजपेयीची. त्याच्याही वाट्याला स्ट्रगल आलाच. स्ट्रगल हे कोणालाही चुकलेले नाही. प्रत्येकालाच सुरूवातीला स्ट्रगल करत स्वतःला सिद्ध करावे लागते. तसेच मनोज वायपेयीनेही स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्ट्रगल केले आहे. त्यामुळे कंगणा सध्या जे काही बोलत संपूर्ण इंडस्ट्रीला शिव्या देत सुटली आहे ते मनोज वाजपेयीला पटलेले नाही. इंडस्ट्रीमध्ये राहून तुम्ही पैसा प्रसिद्धी प्रतिष्ठा मिळवत असता. केवळ काही दहा पंधरा लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला वाईट म्हणणे चुकीचे आहे. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीला  काहाहीह बोलता.  तुमच्या ज्या समस्या आहेत. त्या मांडा कोणालाच काही प्रॉब्लेम नाही. पण एक पद्धत असते. मर्यादा ओलांडून बोलाल तर कसं सगळे कोणी ऐकून घेईल. उगाचच वायफळ बोलून तुम्ही स्वतःला जगासमोर काय सिद्ध करता हे स्पष्ट होते. असे सांगत मनोज वाजपेयीनेही कंगणावर संताप व्यक्त केला आहे. 

कंगणाने 'मणिकर्णिका' सिनेमावेळी लावले होते सोनू सूदवर गंभीर आरोप

कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. जया बच्चन यांना टार्गेट केल्यावर कंगनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या टिकेचा सामना करावा लागत आहे.  सोनू सूदने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, 'सन्मान मिळवण्यासाठी समोर या. केवळ प्रसिद्ध होण्यासाठी नाही. असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत जे आता कधीच सन्मान मिळवू शकणार नाहीत'.सोनू सूद आधी कंगनाचा सिनेमा 'मर्णिकर्णिका'मध्ये काम करत होता. त्याने ४५ दिवसांचं शूटींगही पूर्ण केलं होतं. पण नंतर कंगना दिग्दर्शनची कमान स्वत: हाती घेतल्यावर सोनूने सिनेमा सोडला. नंतर कंगनाने सोनूवर आरोप लावला होता की, त्याला एका महिलेच्या दिग्दर्शनाखील काम कराचयं नव्हतं. म्हणून त्याने सिनेमा सोडला.

कंगनाने जया बच्चन यांच्या वक्तव्यावर केला पलटवार ! 

ती ट्विट करत म्हणाली की, जया बच्चन आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले आहे. एक ताट मिळाले होते ज्यामध्ये दोन मिनिटांचा आयटम्स नंबर्स आमि एका रोमँटिक सीनचा रोल मिळायचा तोसुद्धा हिरोसोबत शय्यासोबत केल्यानंतर. त्यानंतर मी या इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकवला. तसेच हे ताट देशभक्ती आणि स्त्रीप्राधान्य असलेल्या भूमिकांना सजवले. जयाजी हे माझे स्वत:चे ताट आहे, असा टोला कंगनाने लगावला.

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन? 

रवी किशन यांच्या विधानानंतर जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ' आमच्या एका खासदाराने लोकसभेत बॉलिवूडच्या विरोधात वक्तव्य केले. हे लाजीरवाणे आहे. मी कोणाचे नाव घेत नाही. तो स्वत: इंडस्ट्री मधून आला आहे. ज्या ताटात जेवायचं त्यालाच छिद्र पाडायचं ही एक चुकीची गोष्ट आहे. इंडस्ट्रीला सरकारच्या संरक्षण आणि पाठिंब्याची आवश्यकता आ

टॅग्स :मनोज वाजपेयीकंगना राणौत