Join us  

येत्या शुक्रवारी बॉक्सआॅफिसवर रंगणार महायुद्ध, एकाच दिवशी रिलीज होणार ९ चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 10:06 PM

या शुक्रवारी दोन नाही, तीन नाही तर एकाचवेळी ९ चित्रपट बॉक्सआॅफिसवर धडकत आहेत. 

एकाच दिवशी दोन वा तीन चित्रपट रिलीज होणे, बॉलिवूडमध्ये सर्वसामान्य झालेय. त्यामुळेच एकाच वेळी दोन-दोन, तीन-तीन चित्रपट प्रदर्शित होण्याचे प्रेक्षकांनाही अप्रूप राहिलेले नाही. बॉलिवूडमध्ये एकाचवेळी इतके चित्रपट बनणार असतील तर बॉक्सआॅफिसवरचा संघर्षही अटळ मानला जात आहे. पण या शुक्रवारी दोन नाही, तीन नाही तर एकाचवेळी ९ चित्रपट बॉक्सआॅफिसवर धडकत आहेत. होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण येत्या शुक्रवारी बॉक्सआॅफिसवर महायुद्ध रंगणार आहे. एकाचवेळी तब्बल ९ सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यात ‘मनमर्जिया’, ‘लव्ह सोनिया’, ‘मित्रों’, ‘लुप्त’, ‘होटल मिलन’, ‘फलसफा’, ‘टर्निंग प्लॉर्इंट’, ‘२२ डेज’ आणि ‘कठोर’ या ९ चित्रपटांचा समावेश आहे.या ९ चित्रपटांपैकी प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक उत्सुकता आहे ती, अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल स्टारर ‘मनमर्जिया’बद्दल. अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची गाणी आधीच तरूणाईने डोक्यावर घेतली आहेत. याशिवाय ‘मनमर्जिया’टीमचे आक्रमक प्रमोशन पाहता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच ताणली गेली आहे. जाणकारांनी या चित्रपटाला बॉक्सआॅफिसवर जबरदस्त ओपनिंग मिळण्याचे भाकित फार पूर्वीचं वर्तवले आहे.मनमर्जिया या चित्रपटाशिवाय ‘लव्ह सोनिया’ आणि ‘मित्रों’ या दोन चित्रपटांचीही चर्चा आहे. ‘मनमर्जिया’नंतर ‘लव सोनिया’ आणि ‘मित्रों’ या दोन चित्रपटांकडूनही जाणकारांना अपेक्षा आहेत.मृणाल ठाकूर, मनोज वाजपेयी, राजकुमार राव, अनुपम खेर, रिचा चड्ढा, फ्रीडा पिंटो आणि आदिल हुसैन सारख्या हरहुन्नरी कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘लव्ह सोनिया’ चित्रपट देह विक्रय व्यवसायातील भीषण वास्तवाकडे लक्ष वेधणारा चित्रपट आहे़. मृणाल ठाकूर या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतेय. तिने यात सोनिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. बहीणीचा शोध घेत घेत ती स्वत: देहविक्री व्यवसायाच्या दलदलीत फसते. अनुपम खेर आणि मनोज वाजपेयी दोघांनीही यात निगेटीव्ह भूमिका साकारली आहे.‘मित्रों’मध्ये कृतिका कामरा आणि जॅकी भगनानी मुख्य भूमिकेत आहेत. ही काही अतरंगी व मजेदार मित्रांची कथा आहे.

टॅग्स :लव्ह सोनियाबॉलिवूड