Join us  

‘मणिकर्णिका’वादावर निर्माते कमल जैन यांनी तोडली चुप्पी! कंगना राणौतची केली भरभरून स्तूती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 5:34 PM

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’वरून कंगना राणौत व सोनू सूद यांच्यात जुंपली असताना आता या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांनी याप्रकरणी पहिल्यांदा चुप्पी तोडली आहे. 

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’वरून कंगना राणौत व सोनू सूद यांच्यात जुंपली असताना आता या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांनी याप्रकरणी पहिल्यांदा चुप्पी तोडली आहे. होय, कमल जैन यांनी कंगनाचा बचावचं केला नाही तर तिची मुक्तकंठाने प्रशंसाही केली. चित्रपटाचे दिग्दर्शक कृष यांच्या अनुपस्थित या चित्रपटाची सूत्रे कंगनाइतकी अन्य कुणीच इतक्या समर्थपणे आपल्या हाती घेतली नसती, असे जैन यांनी म्हटले आहे.

 त्यांनी सांगितले की, सध्या मुंबईजवळ कर्जत येथे या चित्रपटाच्या काही भागांचे शूटींग सुरू आहे. शेवटचे शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर आम्ही चित्रपट बघितला आणि यात आणखी काही सीन्सची गरज असल्याचे आमचे मत पडले. पॅचवर्कशिवाय काही नवे सीन्स यात समाविष्ट करण्यात आले. या सीन्सच्या शूट्ससाठी आम्ही कंगनाला डेट्स मागितल्या. पण तोपर्यंत दिग्दर्शक कृष त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये बिझी झाले होते. अशास्थितीत कंगनाने ज्या रचनात्मक पद्धतीने या चित्रपटाची पुढची सूत्रे आपल्या हातात घेतली की, ते पाहून आम्ही अवाक् झालोत. चित्रपट पुढे नेण्यासाठी कंगनाइतकी उत्तम व्यक्ती कुणीच नाही, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलोत. त्यामुळेचं हा प्रोजेक्ट थांबला नाही, निर्माता आणि स्टुडिओने एकमताने पॅचवर्कसाठी कंगनाची निवड केली. सध्या चित्रपटाचे शूटींग वेगात सुरू आहे आणि ठरलेल्या तारखेला म्हणजे पुढील वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.काल-परवा सोनू सूद याने अचानक हा चित्रपट सोडल्याचे समोर आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. कंगनाच्या उर्मट वागण्याला कंटाळून सोनू सूदने हा चित्रपट सोडल्याचे म्हटले गेले होते. यानंतर कंगनाने याप्रकरणी खुलासा करत, सोनूला एका महिला दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायचे नव्हते. त्याचा पुरूषी अहंकार दुखावला, असे  तिने म्हटले होते़

 

 

टॅग्स :कंगना राणौत