Join us

क्रेझी चाहत्यांनी खास मनीष पॉलसाठी आयोजित केली डिनर पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 18:11 IST

‘देसी मुंडा’ मनीष पॉलने डलासमध्ये आयोजित ‘द-बँग टूर’दरम्यान दमदार परफॉर्मन्स दिला. त्याच्या या परफॉर्मन्सला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोबतच आयुष्यभर पुरेल इतकी प्रेमाची शिदोरीही सोबत दिली. 

बॉलिवूड आणि या बॉलिवूडचे क्रेझी फॅन्स याचे अनेक किस्से आत्तापर्यंत आपण ऐकले असतील. सध्या जगभर सुरू असलेल्या ‘द-बँग टूर’मधील बॉलिवूड कलाकारांनाही अशाच क्रेझी फॅन्सचा अनुभव येतोय. अनेकांचे अनुभव तर प्रचंड सुखद आहे. असाच एक बॉलिवूडचा कलाकार म्हणजे, मनीष पॉल. होय, अभिनेता मनीष पॉलला अलीकडे ‘द-बँग टूर’दरम्यान असाच सुखद अनुभव आला. ‘देसी मुंडा’ मनीष पॉलने डलासमध्ये आयोजित ‘द-बँग टूर’दरम्यान दमदार परफॉर्मन्स दिला. त्याच्या या परफॉर्मन्सला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोबतच आयुष्यभर पुरेल इतकी प्रेमाची शिदोरीही सोबत दिली. होय, काही क्रेझी चाहत्यांनी खास डिनर पार्टी आयोजित केली. मनीषनेही चाहत्यांचे हे प्रेमाचे निमंत्रण तितक्याच प्रेमाने स्वीकारले आणि मग रंगली डिनर पार्टी. अख्खी संध्याकाळ मनीषने डलासमधल्या या चाहत्यांसोबत घालवली. या डिनर पार्टीत खास मनीषच्या आवडीची पक्वाने होती.

मनीष जेव्हा केव्हा डलासला जातो, तेव्हा आपल्या काही विशिष्ट चाहत्यांना आवर्जून भेटतो. यापैकी अनेकांशी मनीषचे कौटुंबिक संबंध आहेत़. अनेक जण मनीषचे चाहते राहिले नाहीत तर चांगले मित्र झाले आहेत.या चाहत्यांबद्दल मनीष म्हणाला की, मी डलासला खूप मस्ती केली. ते लोक केवळ माझे चाहते नाहीत तर माझ्या कुटुंबाचा भाग आहेत. मी डलासला गेलो की, यांना न चुकता भेटतो. त्यांच्यासोबत वेळ घालवताना मी विदेशात आहे, असे चुकूनही जाणवत नाही.सलमान खान दरवर्षी ‘द-बँग टूर’ आयोजित करतो. या टूरमधील कलाकार जगातील अनेक देशात धमाकेदार परफॉर्मन्स देतात. सध्या अमेरिका व कॅनडा या दोन देशांतील विविध शहरात ‘द-बँग टूर’चे परफॉर्मन्स होत आहेत. सलमान खान, मनीष पॉलशिवाय कॅटरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस, डेजी शाह या ‘द-बँग टूर’चा भाग आहेत.