Join us  

बेबी बंप फ्लॉट करताना मंदिरा बेदीचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 7:00 AM

मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. २०११ सालामध्ये मंदिरा बेदीने मुलाला जन्म दिला होता. तिच्या मुलाचं नाव वीर आहे.विशेष म्हणजे लग्नाच्या सुमारे 12 वर्षानंतर मंदिराने मुलाला जन्म दिला होता.

वयाच्या 49व्या वर्षीही मंदिरा बेदी फिटनेसवर बरंच लक्ष देते.शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते.कधी टोन्ड बॉडी दाखवताना तर कधी योगा मुव्हज करताना मंदिरा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.वेगवेगळ्या योगा पोजेस दाखवून अनेकदा चाहत्यांचीही बोलती बंद होते इतके कठिण योगासणं ती करते. सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करताचा फोटो तिने शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. मंदिरा प्रेग्नंट तर नाही ना अशा उलट सुलट चर्चाही सुरु झाल्या आहेत. 

पण मंदिराने शेअर केलेला फोटो हा आत्ताचा नसून जुना फोटो आहे. तिच्या प्रेग्नंसी दरम्यानचा हा फोटो आहे. जुनाच फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या प्रेग्नंसीची चर्चा रंगली आहे. सध्या मंदिराचा बेबी बंप असलेला फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. यावर चाहतेदेखील कमेंट्स करत मनातले प्रश्नही विचारताना दिसत आहेत.

मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. २०११ सालामध्ये मंदिरा बेदीने मुलाला जन्म दिला होता. तिच्या मुलाचं नाव वीर आहे.विशेष म्हणजे लग्नाच्या सुमारे 12 वर्षानंतर मंदिराने मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. गरोदरपणात एका मुलाखतीमध्ये मंदिराने सांगितले होते की, जेव्हा मी 39 वर्षांची होते, तेव्हा मला मुलगा झाला, ज्यात माझ्या पतीने मला खूप सहकार्य केले. यावेळी तिने आपल्या पर्सनल लाईफबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. 

मंदिराने सांगितले होते की, करिअरमुळे जवळपास 12 वर्षे आई होण्यापासून दूर पळत राहिली. कारण मनोरंजन जगात महिलांचे करिअर जास्त मोठं नसतं. आज मंदिरा बेदी दोन मुलांची आई आहे ९ वर्षाचा मुलगा राज आणि ४ वर्षाची मुलगी तारा आहे. ताराही मंदिरा आणि राज यांची दत्तक मुलगी आहे. गेल्याच वर्षी लॉकडाऊनमध्ये तारा या कपलच्या आयुष्यात आली होती. मुलांसह मस्त मजा मस्ती करतानाचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

टॅग्स :मंदिरा बेदी