Join us  

सुई-धागामधून लवकरच भेटीला येणार ममता आणि मौजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 4:38 PM

‘सुई धागा: मेड इन इंडिया’ या चित्रपटात वरुण टेलरची तर अनुष्का भरतकाम करणाऱ्या महिलेची भूमिका बजावत आहे.

ठळक मुद्देवरूणने मौजी आणि अनुष्काने ममताची भूमिका साकारली आहे. ‘सुई धागा: मेड इन इंडिया’ हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

मागील वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीबरोबर लग्नबेडीत अडकल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा लगेचच ‘सुई धागा: मेड इन इंडिया’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच वरूण धवन आणि अनुष्का शर्मा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात वरूणने मौजी आणि अनुष्काने ममताची भूमिका साकारली आहे.या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली असून २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वरूण धवन आणि अनुष्काने आपला एक फोटो शेअर करत ही तारीख सोशल मीडियावर घोषित केली आहे. यामध्ये वरूण आणि अनुष्का दोघेही एका वेगळ्याच अवतारात दिसत आहेत.

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘पटाखा’ हा चित्रपटदेखील २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘सुई धागा: मेड इन इंडिया’ आणि ‘पटाखा’ या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. ‘पटाखा’ मध्ये ‘दंगल’फेम सान्या मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

 

‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या ‘सुई धागा: मेड इन इंडिया’ या चित्रपटात वरुण टेलरची तर अनुष्का भरतकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरत कटारिया करत आहे. आतापर्यंत वरूणने विविध भूमिका केल्या आहेत. तर अनुष्कादेखील पहिल्यांदाच एका गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांनीही आतापर्यंत ग्लॅमरस भूमिका केल्या होत्या. स्वदेशी वस्तूंवर नेहमीच आपल्या देशात जोर देण्यात आला आहे. याचसंदर्भात एका विशिष्ट अंदाजात हा चित्रपट भाष्य करणार असल्याचे वरूणने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.वरूण व अनुष्काला एका वेगळ्या अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :वरूण धवनअनुष्का शर्मा