भाचा तैमूरचा फोटो बघून मामा रणबीर कपूर म्हणाला, ‘कोण आहे हा?’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 19:13 IST
सैफ अली खान आणि करिना कपूर-खान यांचा लाडका तैमूर आता सहा महिन्यांचा झाला असून, त्याला आतापासूनच इंटरनेट सेन्सेशन आहे. ही बाब मम्मी करिनालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहे.
भाचा तैमूरचा फोटो बघून मामा रणबीर कपूर म्हणाला, ‘कोण आहे हा?’
सैफ अली खान आणि करिना कपूर-खान यांचा लाडका तैमूर आता सहा महिन्यांचा झाला असून, त्याला आतापासूनच इंटरनेट सेन्सेशन आहे. ही बाब मम्मी करिनालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कारण तिने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, तैैमूर जगातील सर्वाधिक गुडलुकिंग मुलांपैकी एक आहे. आतापर्यंत जेव्हा-जेव्हा तैमूरचा फोटो इंटरनेटवर झळकला तेव्हा-तेव्हा केवळ त्याच्या फोटोविषयीच चर्चा रंगल्या; मात्र मामा रणबीर कपूर कदाचित बºयाच दिवसांपासून तैमूरला भेटला नसावा. त्यामुळेच जेव्हा त्याने तैमूरचा एक गोंडस फोटो बघितला तेव्हा तो दंग राहिला. त्याने म्हटले ‘कोण आहे हा?’ सध्या रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ त्यांच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ज्याकरिता हे दोघे एका प्रायव्हेट रेडिओ स्टेशनमध्ये पोहोचले होते. या रेडिओच्या आरजेने जेव्हा रणबीरला तैमूरचा फोटो दाखविला तेव्हा त्याची रिअॅक्शन धक्कादायक होती. त्याने चिमुकल्या तैमूरचा फोटो बघून म्हटले की, ‘अरे कोण आहे हा?’ यावेळी त्याने असेही म्हटले की, जेव्हा मी करिनाच्या तैमूरला बघितले होते तेव्हा तो तीन महिन्यांचा होता; मात्र जेव्हा मी गेल्या काही दिवसांमध्ये इंटरनेटवर या मुलाचे फोटो बघितले तेव्हा मी विचार करीत होतो की, ‘इतका क्यूट मुलगा कोणाचा असेल?’ वास्तविक तैमूरचे फोटो बघून रणबीरच नव्हे तर आम्हीदेखील त्याचे कौतुक करताना अजिबात थांबत नाही. करिनाचा हा लाडका जन्मल्यापासूनच चर्चेत आहे. त्याच्या गुड लुक्समुळे नेटकरी अक्षरश: त्याच्या प्रेमात पडले आहेत. अशात मामा रणबीरचा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. असो गेल्यावर्षी तैमूरचा जन्म झाला असून, काही दिवसांपूर्वीच तो तुषार कपूरचा मुलगा ‘लक्ष’ याच्या बर्थ डे पार्टीत मम्मी करिनासोबत सहभागी झाला होता. त्यावेळी त्याचे फोटो मीडियामध्ये चांगलेच व्हायरल झाले होते. लक्षच्या बर्थ डे पार्टीत तैमूर शो स्टॉपर राहिला. असो, सध्या रणबीर त्याच्या एक्स गर्लफ्रेण्ड कॅटरिनासोबत जग्गा जासूसच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दोघेही ब्रेकअप विसरून प्रमोशनमध्ये मग्न झाल्याने ते पुन्हा एकमेकांच्या प्रेमात तर पडले नाहीत ना? अशा चर्चांना सध्या जोर आला आहे. त्यांचा हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे.