Join us

मल्लिकाचा जाट आंदोलकांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 00:49 IST

आरक्षणासाठी उग्र आंदोलन करीत दिल्लीचा पाणीपुरवठा खंडित करणाºया जाट आंदोलकांना हरियाणाची पुत्री म्हणवून घेणारी अभिनेत्री मल्लिका शेरावतने शांततेचे आवाहन ...

आरक्षणासाठी उग्र आंदोलन करीत दिल्लीचा पाणीपुरवठा खंडित करणाºया जाट आंदोलकांना हरियाणाची पुत्री म्हणवून घेणारी अभिनेत्री मल्लिका शेरावतने शांततेचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे जाट समाजाला ओबीसी या आरक्षित वर्गातून सरकारी नोकरीत आरक्षण हवे आहे. मल्लिकाने ट्विट करून जाट समाजाला आवाहन केले आहे. ती म्हणते, ‘आंदोलकांनी आता शांत व्हावे’, काही दिवसांपूर्वी रणदीप हुडानेही असेच आवाहन केले होते. मल्लिका हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील एका खेडेगावातून आलेली अभिनेत्री आहे.रणदीपही जाट समाजाचा आहे. दोघांनीही ख्वाईश, मर्डर, डर्टी पॉलिटिक्स या हिंदी चित्रपटांत काम केले आहे. प्रत्येक मागणीसाठी आंदोलनच करणे योग्य नाही. चर्चेच्या व शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटू शकतो, असे मल्लिकाने ट्विरवर म्हटले आहे. बघू या, आता आंदोलक काय करतायेत?