Join us  

दबंग सिरीज मधून मलायकाची एक्झिट?, अर्जुन कपूर ठरतोय कारण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 10:23 AM

गेल्या अनेक दिवसांपासून अरबाज खानचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट 'दबंग 3' ची चर्चा आहे. 'दबंग 2' नंतर तब्बल सात वर्षांनी हा सिनेमा फ्लोअरवर येतो आहे.

ठळक मुद्देमलायकाच्या जागी करिना कपूरची वर्णी लागली आहे नाराज झालेल्या सलमान आणि अरबाजने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे

गेल्या अनेक दिवसांपासून अरबाज खानचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट 'दबंग 3' ची चर्चा आहे. 'दबंग 2' नंतर तब्बल सात वर्षांनी हा सिनेमा फ्लोअरवर येतो आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाची जोडी पुन्हा एकदा या सिनेमात झळकणार आहे. याआधीच्या दोन्ही सीझनमध्ये हिच जोडी हिट ठरली होती. सध्या सलमान 'भारत' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे त्यानंतर तो 'दबंग 3' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मात्र या सगळ्या दरम्यान एक वेगळीच चर्चा सध्या रंगली आहे, ती म्हणजे 'दबंग 3' मधून मलायका अरोराचा पत्ता कट करण्यात आला आहे. तुम्ही बरोबर वाचलंत दबंगच्या तिसऱ्या सीझनमध्ये मलायका अरोराचा डान्स नंबर नसणार आहे. रिपोर्ट नुसार सलमान आणि अरबाज खानने मिळून हा निर्णय घेतल्याचे समजतेय. मलायकाच्या जागी करिना कपूरची वर्णी लागली आहे. आपला जलवा दाखवला होता. ‘दबंग 3’मध्येही करिना अशाच एका धम्माल गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. प्रभू देवा या आयटम साँगची कोरिओग्राफी करणार आहे.

अरबाजशी घटस्फोट झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत हातात हात घालून खुलेआम फिरताना दिसतेय. याच कारणामुळे नाराज झालेल्या सलमान आणि अरबाजने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. लवकरच अर्जुन आणि मलायका लग्नाच्या बेडीत अडकणार अशी जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये आहे. सलमानने तर अर्जुनसोबत काम करण्यासदेखील नकार दिला आहे. त्यामुळे सलमानच्या आगामी सर्व प्रोजेक्टमधनू मलायका आणि अर्जुनचा पत्ता कायमचा कट झाला असे म्हणायला हरकरत नाही.   

टॅग्स :मलायका अरोरासलमान खानअर्जुन कपूरअरबाज खानदबंग 3