Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिमला गेली होती की फोटोशूट करायला, मलायका अरोरा लस घेतल्यानंतर होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 18:47 IST

मलायका अरोराचा हा दुसरा डोस होता. फोटो शेअर करताच नेटीझन्सने पुन्हा तिच्यावर निशाणा साधला.

मलायका अरोराची कोणतीही गोष्ट असो त्याची चर्चा होतेच. सतत ती तिच्या खासगी गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकताच सोशल मीडियावर मलायकाने लस घेतल्यानंतरचा फोटो शेअर केला होता. मलायकाचा हा दुसरा डोस होता. फोटो शेअर करताच नेटीझन्सने पुन्हा तिच्यावर निशाणा साधला.  मीडियाच्या कॅमे-यांना नेहमीप्रमाणे तिने पोज द्यायला सुरुवात केली. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी लस घेण्यासाठी गेलेली मलायकाने परिधान केलेले कपडे पाहून नेटीझन्सचा संताप होत आहे. 

जिमला गेली होती की फोटोशूट करायला अशा प्रतिक्रीया तिच्या या फोटोंवर उमटत आहे. ५० वर्षाच्या मलायकाल इतकेही माहिती नाही की, व्हॅक्सिनेशन सेंटवर कसे जायला हवे. लॉकडाउनमध्ये ना काम मिळतंय, ना पब्लिसिटी. त्यामुळे सतत चर्चेत राहण्यासाठी  मलायका पापाराझी आणि कॅमेर्‍यांना पोज देण्यात नेहमीच उतावीळ असते.अनेकदा मलायका तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळेच जास्त ट्रोल होत असते. त्यामुळे यावेळीही ती नेटीझन्सच्या निशाण्यावर आली आहे.

अलीकडेच अर्जुनने आपला वाढदिवस ताज हॉटेलमध्ये साजरा केला, तिथे अनेक सेलेब्स उपस्थित होते, परंतु मलायका अरोरा येथे दिसली नाही. याशिवाय मलायकाने अर्जुनसाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने अर्जुनला तिचा 'सनशाईन' असं कॅप्शन देत फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून अनेकांच्या नजरा फोटोंवरच खिळल्या होत्या. अनेकदा दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत एकमेकांवरचे प्रेम अप्रत्यक्षरित्या जाहीर करताना दिसतात.

टॅग्स :मलायका अरोराकोरोनाची लस