Join us  

मलायकाची इच्छा, मुलगाही राजी...; घरी होणार का नव्या सदस्याची एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 2:05 PM

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora ) सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. पण सध्या मलायकाची चर्चा होतेय ती एका वेगळ्याच कारणाने.

ठळक मुद्देअलीकडेच  'सुपर डान्सर चॅप्टर 4' या रिएलिटी शोमध्ये  मलायकाने मुलीची आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora )सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. कधी जिमच्या बाहेरच्या फोटोंमुळे, कधी अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे  तिची चर्चा होते. पण सध्या मलायकाची चर्चा होतेय ती एका वेगळ्याच कारणाने. होय, तिच्या आयुष्यात एका नव्या सदस्याची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. खुद्द मलायकाने एका ताज्या मुलाखतीत स्वत: यावर बोलली. मलायकाला मुली खूप आवडतात. मुलगी व्हावी, अशी मलायकाची भरून इच्छा होती. पण तिला झाला पहिला मुलगा. या मुलावर मलायका जिवापाड पे्रम करते. मात्र मुलीची इच्छा कधीकधी अनावर होते. त्यामुळे एक मुलगी दत्तक घेण्याची मलायकाची इच्छा आहे. यावर मलायका बोलली.

‘मी माझ्या मुलावर खूप प्रेम करते मात्र मला सुरुवातीपासूनचं एका मुलीची आई व्हायचं होतं. कारण मी ज्या कुटुंबातून आहे. तिथे सर्वात जास्त मुलीचं आहेत. त्यामुळे मला मुलींबद्दल खूपच ओढ आहे. मी एका मुलीला दत्तक घेऊन तिला एक सुंदर आयुष्य देऊ इच्छिते. सध्या याबद्दल काहीही नियोजन झालेलं नाहीय. मात्र माझी ही इच्छा आहे. माझ्या अनेक मित्रांनी मुले दत्तक घेतली आहेत. त्यामुळे मलाही ही इच्छा आहे. मी याबद्दल माझ्या मुलाशीदेखील बोलले आहे. माझा मुलगा माझ्या प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य करतो. माझ्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे तो अस्वस्थ झाला होता. मात्र काळ गेला तसा हा निर्णय योग्य होता, हे त्यालाही कळलं.

अलीकडेच  'सुपर डान्सर चॅप्टर 4' या रिएलिटी शोमध्ये  मलायकाने मुलीची आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच मुलगी दत्तक घेणार असल्याचे तिने म्हटले होते. तिला नेहमीच मुलीची आई व्हायची ईच्छा असल्याचे तिने म्हटले होते. मलायका अरोरा 47 वर्षांची आहे आणि अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन कपूरला  डेट करत आहे. 

टॅग्स :मलायका अरोरा