Join us

अर्जुन कपूरबरोबरच्या अफेयरवर मलाइका अरोराने दिले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 17:25 IST

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील अफेयरच्या चर्चा रंगत आहे. याच कारणामुळे मलाइकाचा पती अरबाज ...

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील अफेयरच्या चर्चा रंगत आहे. याच कारणामुळे मलाइकाचा पती अरबाज खान याने तिच्याशी असलेले नाते तोडले आहे. मात्र या चर्चेवर आता मलाइकाने चुप्पी तोडली असून, पहिल्यांदाच तिने याविषयी उत्तर दिले आहे. मलाइकाने म्हटले की, याविषयी गॉसिप करण्याची काय गरज आहे. त्याचे झाले असे की, मलाइका, बिपाशा बसू आणि सुजेन खान एकत्र एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी एका पत्रकाराने मलाइकाला तिच्या अर्जुनसोबतच्या अफेयरविषयी विचारले. त्यावर उत्तर देताना मलाइकाने म्हटले की, सीरियसली तुम्ही आमच्याविषयी (बिपाशा आणि सुजेन) बोलायला हवे. आम्ही तिघीही इंडिपेंडेंट वुमन आहोत. आम्ही काय करतो, कोणाला भेटतो, आमच्यात काय संवाद होतो, यावर तुम्ही का प्रश्न विचारत नाहीत? गॉसिप करणे गरजेचे आहे काय? असेही मलाइकाने उत्तर दिले. अर्जुन कपूरसोबतच्या अफेयरच्या अफवांवर मलाइकाने अतिशय चतुराईने उत्तर दिले. स्टार प्लसवरील रिअ‍ॅलिटी शो ‘नच बलिए-८’मध्ये मलाइका जजच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोमध्ये तिने सोनाक्षी सिन्हाला रिप्लेस केले आहे. नुकताच अर्जुन कपूर या शोमध्ये श्रद्धा कपूरसोबत त्यांच्या ‘हाफगर्लफ्रेण्ड’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. यादरम्यान अर्जुन आणि मलाइकाने एकमेकांसोबत दूर राहणे पसंत केले. तसेच एकमेकांसोबत फारसे बोललेही नाही. मात्र अशातही काही फोटोंमध्ये मलाइका आणि अर्जुन एकत्र दिसत असल्याने त्यांच्यातील अफेयरवर आणखी चर्चा रंगत आहे. रिपोर्टसनुसार मलाइका आणि अर्जुन कपूर यांच्यातील अफेयरच्या चर्चा गेल्या वर्षी मे महिन्यापासून सुरू झाल्या. बºयाचदा हे दोघे एकत्र बघावयास मिळाल्याने या चर्चांना अक्षरश: उधान आले आहे. काही फोटोंमध्ये तर हे दोघेही हातात हात घालून फिरत असल्याचे दिसत आहे.