Join us  

मलायका अरोराने बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा Inside Video

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 10:32 AM

बॉलिवूडची ‘मुन्नी’ मलायका अरोरा हिचा आज वाढदिवस. आज मलायका 46 वा वाढदिवस साजरा करतेय.

ठळक मुद्देगत ६ जुनला अर्जुनचा वाढदिवस होता. अर्जुनला बर्थ डे विश करताना, मलायकाने त्याच्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

बॉलिवूडची ‘मुन्नी’ मलायका अरोरा हिचा आज वाढदिवस. आज मलायका 46 वा वाढदिवस साजरा करतेय. काल रात्री बाराच्या ठोक्याला मलायकाच्या वाढदिवस साजरा झाला.

बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर आणि करिना कपूर, करिश्मा कपूर, अनन्या पांडे, तारा सुतारिया, करण जोहर, अर्जुन रामपाल आदींसोबत मलायकाने आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. या बर्थ पार्टीचे काही इनसाईड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

सहा वर्षानंतर पहिल्यांदा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मलायका मुंबईत होती. यापूर्वीचे तिचे अनेक वाढदिवस देशाबाहेर साजरे झालेत. काल मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात मलायकाच्या वाढदिवसाची पार्टी रंगली.

या पार्टीचे काही फोटो मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. पार्टीत मलायकाने सिल्व्हर कलरचा वनपीस घातला हाता. करिना व मलायकाची बहीण अमृता अरोरा याही वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसल्या.

करण जोहर, शनाया कपूर, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, करिश्मा कपूर, अर्जुन रामपाल, अक्षय कुमार, टिष्ट्वंकल खन्ना, राज कुमार राव, गौरी खान अशा अनेकांनी मलायकाच्या बर्थ पार्टीला हजेरी लावली.मलायकाचा मुलगा अरहान हाही या पार्टीत हजर होता. 

मलायकाच्या पार्टीचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत मलायका डान्स करताना दिसतेय. सध्या मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळतात.  कधी डिनर डेटवर तर कधी एकत्र इव्हेंटमध्ये ते एकत्र दिसतात.   हे कपल लवकरच विवाहबंधनातही अडकणार असेही मानले जात आहे. 

गत ६ जुनला अर्जुनचा वाढदिवस होता. अर्जुनला बर्थ डे विश करताना, मलायकाने त्याच्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शिवाय आपले नाते जगजाहिर केले होते.  सुरुवातीला मलायका व अर्जुन दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.

टॅग्स :मलायका अरोरा