मलाइका अरोराने पोटगीपोटी अरबाज खानकडे मागितले १५ कोटी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2017 17:45 IST
दोन दिवसांपूर्वीच बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने अभिनेता अरबाज खान आणि मलाइका अरोरा यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. त्याचबरोबर या दोघांचा तब्बल ...
मलाइका अरोराने पोटगीपोटी अरबाज खानकडे मागितले १५ कोटी?
दोन दिवसांपूर्वीच बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने अभिनेता अरबाज खान आणि मलाइका अरोरा यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. त्याचबरोबर या दोघांचा तब्बल १८ वर्षांचा संसारही संपुष्टात आला. परंतु हे दोघे नेमके कोणत्या कारणाने विभक्त झाले, या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्यापही मिळू शकले नाही. स्पॉटबॉयने दिलेल्या रिपोर्टनुसार मलाइकाने पोटगीपोटी अरबाजकडे तब्बल १५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. एका सूत्राने सांगितले की, यात काहीच शंका नाही की, मलाइका कमीत कमी १० कोटी रुपयांची मागणी करीत आहे. यापेक्षा कमी रक्कम ती स्वीकारणारदेखील नाही. मात्र जेव्हा मलाइकाला याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने यास निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. तर मलाइकाच्या वकील अॅड. वंदना शाह यांना जेव्हा याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ‘नो कमेंट्स’ असे उत्तर दिले. असो पण, हा विषय येथेच संपत नाही. इंटरटेन्मेंट पोर्टलने हा दावा केला की, अरबाज खानने मुलाच्या कस्टडीसाठी न्यायालयात स्वातंत्र अर्ज दाखल केला आहे. वास्तविक न्यायालयाने मुलाची कस्टडी मलाइकाला सोपविली आहे. मात्र अरबाज आपल्या मुलापासून दूर राहण्यास तयार नसून, त्याने मुलाला एक अपार्टमेंटही गिफ्ट केली आहे. अशात मलाइका अन् अरबाजमध्ये आता मुलाच्या कस्टडीवरून न्यायालयीन लढाई रंगण्याची शक्यता आहे. पण काहीही असो या दोघांचे नाते अखेरपर्यंत मजेशीर असे राहिले आहे. कारण न्यायालयाच्या निर्णयापर्यंत हे दोघे एकमेकांसोबत फिरताना बघावयास मिळाले. आजही हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. नुकतेच हे दोघे मुंबई येथील जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टला मुलाला घेऊन पोहोचले होते. याव्यतिरिक्त अनेक फॅमिली फंक्शन व पार्ट्यांमध्ये त्यांना बघण्यात आले आहे. अशात न्यायालयाच्या निर्णयानंतर हे दोघे विभक्त होणार काय? हे बघणे मजेशीर ठरेल.