Join us

​अखेर मलायका अरोरा व अरबाज खानचा घटस्फोट! कोर्टाची मंजुरी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 15:04 IST

मलायका अरोरा ही अरबाज खानच्या घराबाहेर दिसली, ही बातमी आजच सकाळी आम्ही तुम्हाला दिली. अरबाजच्या घरातून बाहेर पडताना मलायका ...

मलायका अरोरा ही अरबाज खानच्या घराबाहेर दिसली, ही बातमी आजच सकाळी आम्ही तुम्हाला दिली. अरबाजच्या घरातून बाहेर पडताना मलायका प्रचंड आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेली होती, हेही आम्ही तुम्हाला सांगितले. पण दुपार होत नाही तर एक वेगळीच बातमी आली. होय, अरबाज खान व मलायका अरोरा दोघेही पती-पत्नी आता कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयाने आज गुरुवारी दोघांच्याही कायदेशीर घटस्फोटास मंजुरी दिली.अरबाज व मलायका या दोघांचा विवाह १९९८ मध्ये झाला होता. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनीही परस्पर सामंजस्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मान्य करत, न्यायालयाने मलायका व अरबाज या दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. मलायका व अरबाजचा मुलगा अरहान याची कस्टडी मलायकाला मिळाली आहे. तो मलायकाकडे राहिल. अरबाज त्याला कधीही भेटू शकेल.अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना बॉलिवूडमधील हॉट कपल मानले जाते. पण मागील काही काळापासून दोघेही एकमेकांपासून दुरावले होते. अखेर या नात्याची परिणीती घटस्फोटात झाली.   कोर्टाच्या नियमानुसार घटस्फोटाचा अर्ज दिल्यावर पती-पत्नीचे समुपदेशन केले जाते. यानंतर दोघांना या निर्णयावर विचार करण्यासाठी कुलिंग आॅफ पिरियेड  दिला जातो. या दरम्यान त्यांचा विचार बदलला व दोघांनी एकत्र राहण्यास संमती दर्शविली तर घटस्फोटाचा अर्ज रद्द होऊ शकतो.  कुलिंग आॅफ पिरियेडमध्ये पती पत्नीच्या समुपदेशनाचे अनेक सेशन होतात.ALSO READ : अरबाज खानच्या घरातून बाहेर पडताना दिसली मलायका अरोरा!या सेशनदरम्यान दोघांनी मॅरेज काऊंसलरने विचारलेल्या प्रश्नांची समजूतदारपणे उत्तरे दिलीत आणि त्यांच्या घटस्फोटाचा मार्ग मोकळा झाला. अर्थात अलीकडे बॉलिवूड एक्स कपल्स एकमेकांसोबत प्रचंड कॅज्युअल झाले आहेत. अरबाज व मलायकाही त्यापैकीच एक आहेत.