Join us  

मलायकाच्या आईसोबत आहे अरबाजचं स्ट्राँग रिलेशन; 'हा' व्हिडीओ ठरतोय चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 6:49 PM

Arbaaz khan: २०१७ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली. मात्र, त्यांच्यातील मैत्री कायम आहे. आजही मलायका किंवा अरबाज एकमेकांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतांना दिसतात.

बॉलिवूडमधील बेस्ट कपल म्हणून एकेकाळी अभिनेता अरबाज खान (arbaaz khan) आणि मलायका अरोरा (malaika arora) या जोडीकडे पाहिलं जायचं.  जवळपास १९ वर्ष संसार केल्यानंतर या दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  या दोघांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता. २०१७ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली. मात्र, त्यांच्यातील मैत्री कायम आहे. आजही मलायका किंवा अरबाज एकमेकांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवतांना दिसतात. सध्या सोशल मीडियावर मलायका, अरबाज आणि मलायकाच्या आईचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाच्या आईचं आणि अरबाजचं हेल्दी रिलेशन दिसून येत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका रेस्टॉरंटबाहेरील असून यात मलायकाची आई आपल्या एक्स जावयाला म्हणजेच अरबाजला प्रेमाने जवळ घेत असल्याचं दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज त्याच्या मुलासोबत अरहानसोबत लंच करुन रेस्टॉरंटबाहेर पडत होता. त्यांच्याच पाठोपाठ मलायकाची आईदेखील बाहेर पडली. यावेळी त्यांनी पाठीमागून अरबाजला हाक मारली आणि थांबायला सांगितलं.  अरबाजनेदेखील त्यांच्या विनंतीचा मान राखला आणि तो लगेचच त्यांच्या दिशेने वळला. त्यानंतर मलायकाच्या आईने प्रेमाने अरबाजला कुरवाळलं आणि त्याच्या गालावर किस केली.

दरम्यान, या व्हिडीओनंतर अरबाज आणि मलायकाच्या आईमधील स्ट्राँग नातं दिसून येत आहे. मलायका- अरबाजच्या घटस्फोटानंतरही  तिची आई अरबाजला आपला लेक मानते हे यावरुन दिसून येतं.

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खानबॉलिवूडसिनेमा