Join us  

किसमे कितना है जोर..; अजय देवगणच्या 'मैदान'मधील खेळाडूंना समर्पित देशभक्तीपर गाणं एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:11 AM

अजय देवगणच्या 'मैदान'मधील नवीन देशभक्तीपर गाणं भेटीला. देशाचं नाव उंचावणाऱ्या सर्व खेळाडूंना समर्पित

अजय देवगण स्टारर 'मैदान'ची उत्सुकता शिगेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा चित्रपट काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. भारतीय फुटबॉल संघासह ज्याने अविस्मरणीय इतिहास रचला अशा प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या वास्तविक जीवनातील कथा 'मैदान'मधून पाहायला मिळणार आहे. अशातच 'मैदान'च्या टीमने "टीम इंडिया हैं हम" नावाचं चित्रपटातील गाणं रिलीज केलं आहे. भारताला गौरव मिळवून देण्यासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या सर्व क्रीडापटूंना हे गाणं समर्पित आहे. 

प्रत्येक भारतीय खेळाडू जेव्हा तिरंग्याचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा त्या भावना आणि त्याचा उत्साह पाहण्यासारखा असतो. अशी भावना जी संपूर्ण राष्ट्राला त्यांच्यासाठी जल्लोषात एकत्र आणते. 'टीम इंडिया हैं हम' हे गाणं संगीतकार ए.आर. रहमान आणि नकुल अभ्यंकर यांनी गायले आहे. मनोज मुंतशिर, स्लो चीता आणि दविंदर सिंग यांनी मैदानमधील गाणी लिहीली आहेत.

झी स्टुडिओज, बोनी कपूर, अरुणवा जॉय सेनगुप्ता आणि आकाश चावला निर्मित, पटकथा आणि संवाद अनुक्रमे सायविन क्वाद्रस आणि रितेश शाह यांनी लिहिली आहेत. संगीत ए आर रहमान आणि गीत मनोज मुंतशिर शुक्ला यांचं आहे. हा चित्रपट ईद,2024 म्हणजेच 10 एप्रिल 2024 रोजी IMAX मध्ये देखील जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 'मैदान' सिनेमात प्रियामणी, गजराज राव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष देखील आहेत.

टॅग्स :अजय देवगणबॉलिवूड