Join us  

महिमा चौधरीचा सुभाष घईंवर मोठा आरोप; म्हणाली, तेव्हा केवळ चौघांनी साथ दिली...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:09 AM

वाचा काय म्हणाली?

ठळक मुद्देसुभाष घईंनी महिमाला पहिला ब्रेक दिला होता. पण याच सुभाष घईंवर पुढे महिमाने कास्टिंग काऊच सारखा गंभीर आरोप केला होता.

‘परदेस’ या चित्रपटामुळे एका रात्रीतून स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. पहिल्याच सिनेमात महिमाला बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. महिमाचा पहिला डेब्यू सिनेमा यशस्वी ठरला. पण या यशाचा तिच्या करिअरला फारसा फायदा झाला नाहीच. गेल्या अनेक वर्षांपासून महिमा बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. आता महिमा अचानक चर्चेत आली आहे. दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर तिने खळबळजनक आरोप केला आहे. सुभाष घईंनी मला धमकावले, असे तिने म्हटले आहे.‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या ताज्या मुलाखतीत महिमा बोलली. ‘मिस्टर घई यांनी मला धमकावले. मला कोर्टापर्यंत घेऊन गेलेत. माझा पहिला शो  रद्द करण्याचे प्रयत्नही केलेत. तो काळ खूप तणावाचा होता,’असे ती म्हणाली.

पुढे तिने सांगितले, ‘1998 आणि 1999 मधील ट्रेड गाईड मॅगझिनचा कुठलाही अंक बघा, त्यात तुम्हाला एक जाहिरात दिसेल. सुभाष घई यांनी ती जाहिरात दिली होती. महिमासोबत काम करायचे तर आधी माझ्याशी संपर्क करा. अन्यथा ते कराराचे उल्लंघन होईल, अशी जाहिरात त्यांनी दिली होती. खरे तर नव्या कामासाठी मला सुभाष घई यांची परवानगी घ्यावी लागेल, असा असा कुठलाही करार मी साईन केला नव्हता.  त्या काळात बॉलिवूडचे केवळ चार सेलिब्रिटींनी मला पाठींबा दिला होता. सलमान खान, संजय दत्त, डेव्हिड धवन आणि राजकुमार संतोषी. हे माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते. डेव्हिड धवन यांनी मला याविरोधत खंबीरपणे लढा देण्याचा सल्ला दिला होता. या चौघांशिवाय कोणीही मला साधा कॉलही केला नाही.’

या मुलाखतीदरम्यान महिमाने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यावरही निशाणा साधला. 1988 मध्ये ‘सत्या’ या सिनेमासाठी माझी निवड झाली होती. मात्र रामगोपाल वर्मा यांनी मला न सांगता अचानक माझ्याजागी उर्मिला मातोंडकरला घेतले. मला मीडियाकडून याची माहिती मिळाली, असे तिने सांगितले.

 सुभाष घईंवर केला होता कास्टिंग काऊचचा आरोपसुभाष घईंनी महिमाला पहिला ब्रेक दिला होता. पण याच सुभाष घईंवर पुढे महिमाने कास्टिंग काऊच सारखा गंभीर आरोप केला होता. असे म्हणतात की, महिमा व सुभाष घई यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार, 5 वर्षांत महिमाला घईंचे 3 सिनेमे करायचे होते. असे न केल्यास महिमाला आपल्या उत्पन्नातील 35 टक्के भाग घईंना द्यावा लागेल. हाच करार पुढे महिमा व सुभाष घईंच्या वादाचे कारण ठरला.

एकीकडे सुभाष घई यांनी महिमाला विदेशात परफॉर्म करण्यापासून रोखले तर दुसरीकडे महिमाने घईंवर करार तोडून ‘ताल’मध्ये तिच्याजागी ऐश्वर्याला घेतल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर यानंतर तिने सुभाषघईंवर अप्रत्यक्षपणे कास्टिंग काऊचचा आरोपही ठेवला होता.

टॅग्स :महिमा चौधरीसुभाष घई