Join us

आलियानं लग्नच करू नये ही महेश भट यांची इच्छा, कारण आहे भलतंच इमोशनल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 18:01 IST

रणबीर व आलियाच्या लग्नाच्या चर्चा कधीच सुरु झाल्या आहेत. रणबीरची आई नीतू सिंग तर लेकाच्या लग्नासाठी अगदी आतूर झाल्या आहेत. पण आलियाचे पापा महेश भट यांचे काय?

ठळक मुद्देआपल्या मुलींनी सासरी जाऊच नये, त्यांनी आयुष्यभर आपल्यासोबत असावे, असे त्यांना वाटते. एकदा तर महेश भट यांनी चक्क शाहीन व आलियाला धमकीच दिली होती.

आलिया भटरणबीर कपूर हे आता केवळ मित्र नाहीत तर हे नाते कधीच मैत्रीच्या पुढे गेले आहे. अगदी लग्नापर्यंत पोहोचलेय. होय, रणबीर व आलियाच्या लग्नाच्या चर्चा कधीच सुरु झाल्या आहेत. रणबीरची आई नीतू सिंग तर  लेकाच्या लग्नासाठी अगदी आतूर  झाल्या आहेत. पण आलियाचे पापा महेश भट यांचे काय तर, लेक लग्न करून कधीच सासरी जाऊ नये, असे त्यांना वाटतेय.

होय, खुद्द आलियाने एका जुन्या मुलाखतीत हा खुलासा केला होता. महेश भट आलिया व शाहिन या दोन्ही मुलींसाठी प्रचंड पजेसिव्ह आहेत. आलियाच्या बाबतीत तर अतीच. लेकीचा स्क्रिनवरचा किसींग सीन आणि रिअल लाईफ डेटींगच्या बाबतीत तर ते आणखीच पजेसिव्ह होतात.

आपल्या मुलींनी सासरी जाऊच नये, त्यांनी आयुष्यभर आपल्यासोबत असावे, असे त्यांना वाटते. एकदा तर महेश भट यांनी चक्क शाहीन व आलियाला धमकीच दिली होती. मी तुम्हाला कधीच नजरेआड होऊ देणार नाही. तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही. तुम्हाला मी खोलीत डांबून ठेवेन.

आलियाने मुलाखतीत धमकीची ही गोष्ट खरी असल्याचे सांगितले होते. पापा माझ्यासाठी व शाहीनसाठी खूप पजेसिव्ह आहेत. मी तुम्हाला कधीच कुठे जाऊ देणार नाही. तुम्ही तसा प्रयत्न केलाच तर मी तुम्हाला खोलीत लॉक करून ठेवेन, असे पापा म्हणाले होते. आम्ही दोघींनी लग्न करू नये असेच त्यांना वाटते. ते केवळ बोलत नाही तर तसे करूही शकतात. कारण ते आम्हा दोघींना दूर जातांना पाहूच शकत नाही. म्हणूनच ते आम्हाला लग्नासाठी मनाई करत असतात, असे आलियाने या मुलाखतीत सांगितले होते. अर्थात तरीही आलिया रणबीरच्या प्रेमात पडलीच. नुसती प्रेमातच नाही तर आता त्याच्यासोबत संसार थाटण्याचीही तयारी तिने केलीये.

टॅग्स :आलिया भटमहेश भटरणबीर कपूर