Join us

महेश भट यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर झाले व्हायरल, मात्र पूजा भटने सांगितले सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 11:37 IST

महेश भट यांचे हृदयविकाराचा झटक्यामुळे निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होते.

निर्माता-दिग्दर्शक महेश भट बॉलिवूडमधील निवडक व्यक्तींपैकी एक आहेत जे प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत परखडपणे मांडण्यासाठी ओळखले जातात.  मात्र बऱ्याचदा त्यामुळे त्यांच्यावर टीका होते. चित्रपटांशिवाय खासगी जीवनामुळे चर्चेत राहणारे महेश भट काल एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले. त्यांचे हृदयविकाराचा झटक्यामुळे निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. मात्र त्यानंतर महेश भटची मुलगी पूजा भट यांनी यामागचे सत्य सांगितलं.

पूजा भटनं ट्विटरवर याबाबतचा खुलासा केला. ती म्हणाली की, अफवा पसरवणारे आणि जे सगळे काळजी करणारे लोक जे माझ्या वडिलांना हृदयविकाराच्या झटक्यामुळे माझ्या वडिलांचे निधन झाले म्हणून चिंता करत होते. त्यांच्यासाठी साक्षात पुरावा आहे ती माझे वडील त्यांच्या अंदाजात जीवन जगत आहेत. विना लेसच्या लाल रंगाच्या शूजमध्ये. यासोबत पूजा भटने महेश भट यांचे दोन फोटो शेअर केला. त्यातील एका फोटोत महेश भट उभे आहेत तर दुसऱ्या फोटोत लाल रंगाचे शूज परिधान करून आराम करत आहेत.

खरेतर सिने अँड टीव्ही आर्टिस्ट एसोसिएशन  (CINTAA) ने एक पोस्ट केली ज्यात त्यांनी गुजराती अभिनेता महेश भट यांच्या निधनावर शोक व्यक्त केले. त्यामुळे असं बोललं जातंय की त्यानंतर दिग्दर्शक महेश भट यांच्या निधनाची अफवा पसरवायला सुरूवात झाली.

 

याबद्दल जेव्हा महेश भट यांचे भाऊ मुकेश भट यांच्याशी एका वेबसाईटनं बातचीत केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, माझा भाऊ बरा आहे. त्यांचे स्वास्थ ठीक असून सडक२मध्ये बिझी आहे.

महेश भट आगामी चित्रपट सडक चित्रपटाच्या सीक्वलमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच आलिया भट वडिलांसोबत काम करताना दिसणार आहे.

या चित्रपटात आलियाशिवाय पूजा भट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० जुलै, २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :महेश भटपूजा भटआलिया भट