Join us  

सिनेमातील मुख्य अभिनेत्रीच्या मृत्यूची खोटी बातमी दिली, महेश भट यांनीही केला होता असा 'स्टंट'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 7:04 PM

अभिनेत्री त्याकाळची टॉपची हिरोईन होती. सिनेमा हिट व्हावा म्हणून महेश भट यांनी तिच्या मृत्यूची बातमीच छापली

मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेने (Poonam Pandey) स्वत:च्या मृत्यूची अफवा पसरवल्यानंतर आता तिच्यावर जोरदार टीका होत आहे. अख्खी फिल्म इंडस्ट्री तिच्याविरोधात गेली आहे. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी तिने हे नाटक रचलं. तिचा उद्देश चांगला असला तरी तिने वापरलेली पद्धत कोणालाच पटलेली नाही. पण असा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने सिनेमा हिट व्हावा म्हणून सिनेमातील अभिनेत्रीच्या मृत्यूची अफवा पसरवली होती. या चीप पब्लिसिटीची नंतर सर्वांनीच निंदा केली होती.

1994 साली आलेला 'क्रिमिनल' हा सिनेमा आठवतोय? यामध्ये नागार्जुन आणि मनिषा कोईराला (Manisha Koirala) मुख्य भूमिकेत होते. महेश भट (Mahesh Bhatt) यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यांनी सिनेमा हिट व्हावा म्हणून शक्कल लढवली आणि मनिषा कोईरालाच्या मृत्यूची अफवा पसरवली. इतकंच नाही तर त्यांनी वर्तमानपत्रात बातमीही छापली. यानंतर फिल्मइंडस्ट्रीतून शोक व्यक्त केला गेला. पण जेव्हा सत्य लोकांसमोर आलं तेव्हाच सगळेच दंग राहिले. महेश भट यांच्यावर प्रचंड टीका झाली. असं म्हणतात की मनिषालाही या स्टंटबद्दल कल्पना नव्हती. 

मनिषाच्या मृत्यूची बातमी भट कॅम्पकडून जाहिरातीच्या स्वरुपात देण्यात आली होती. कारण सिनेमात मनिषाचा मृत्यू होतो असा सिक्वेन्स होता. त्याचीच पब्लिसिटी म्हणून महेश भट यांनी ही आयडिया केली. मात्र नंतर त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं. इतकंच नाही तर ज्यासाठी हा अट्टहास केला तो सिनेमाही जोरदार आपटला होता. 

टॅग्स :महेश भटमनिषा कोईरालाबॉलिवूडसिनेमा