Join us  

"माझी मुलंही माझ्याकडे दुर्लक्ष करतात, महत्त्व देत नाहीत"; माधुरी दीक्षितनं मांडलं आईचं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 3:02 PM

Madhuri dixit: माधुरी दीक्षितने यावेळी कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला नसून तिच्या मानातील दु:ख चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

ठळक मुद्देसध्या माधुरी छोट्या पडद्यावरील 'डान्स दीवाने' या कार्यक्रमात जजच्या रुपात झळकत आहे.

उत्तम अभिनयशैली आणि अदाकारीमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित . देशातच नाही तर विदेशातही  धकधक गर्ल या नावाने माधुरी ओळखली जाते. त्यामुळेच तिचा चाहतावर्गदेखील अफाट असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी कायमच प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या जीवनातील काही प्रसंग किंवा किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला नसून तिच्या मानातील दु:ख चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

सध्या माधुरी छोट्या पडद्यावरील 'डान्स दीवाने' या कार्यक्रमात जजच्या रुपात झळकत आहे. याच कार्यक्रमात माधुरीने तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. माझी मुलं मला जराही किंमत देत नाही, माझ्याकडे दुर्लक्ष करतात, असं ती यावेळी म्हणाली.

सुहाना खान ते न्यासा देवगणपर्यंत; विदेशातील 'या' विद्यापीठांमध्ये स्टारकिड्स  घेतात शिक्षण

अलिकडेच या शोमधील स्पर्धकाने आपल्या आईसाठी एक डान्स परफॉर्मेन्स केला. यावेळी आईच्या फोनकडे दुर्लक्ष करणं आणि तिला महत्त्व न दिल्याची मला फार खंत वाटते, असं या स्पर्धकाने सांगितलं. त्याच्या या वक्तव्यानंतर माधुरीनेही तिच्या मुलांविषयी काही गोष्टींचा खुलासा केला. 

"काही वेळा माझी मुलं सुद्धा माझ्याकडे दुर्लक्ष करतात आणि मला फारसं महत्त्व देत नाहीत. त्यावेळी मला सुद्धा प्रचंड वाईट वाटतं. पण, मी त्यावेळी काहीच करु शकत नाही", असं माधुरी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "या जगात प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते. ज्यावेळी मी लहान होते त्यावेळी मी सुद्धा असंच करायचे. पण, आता मी एक आई झाल्यानंतर त्यावेळी आईचं दु:ख काय असतं हे मला समजतंय."

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच 'या' स्पर्धकाला आला पॅनिक अटॅक

दरम्यान, माधुरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. त्यामुळे अनेकदा ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. माधुरीला दोन मुलं असून मोठ्या मुलाचं नाव आरिन आहे. आरिन नुकताच ग्रॅज्युएट झाला आहे. 

टॅग्स :माधुरी दिक्षितसेलिब्रिटीबॉलिवूड