शाहिदची 'रंगून'साठी जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:28 IST
दि ग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपट 'रंगून' साठी शाहीद कपूर जोरदार तयारी करताना दिसत आहे. शाहीद कपूर, कंगणा ...
शाहिदची 'रंगून'साठी जोरदार तयारी
दि ग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपट 'रंगून' साठी शाहीद कपूर जोरदार तयारी करताना दिसत आहे. शाहीद कपूर, कंगणा राणावत आणि सैफ अली खान हे तिघेही एकाच चित्रपटांत प्रथमच काम करणार आहेत. प्रेमाचा त्रिकोण असलेल्या या चित्रपटात शाहीदचा लुक एकदम हटके दिसणार आहे. त्याने टिवट केले आहे की, टाईम टू प्रेप फॉर रंगून. माईल्स टू गो बिफोर आय स्लिप. किप इट रिअल यू ऑल. अँण्ड बिलीव्ह. बिकॉज यू कॅन.' शाहीद त्याच्या भूमिकेविषयी बोलताना म्हणतो की,' सध्या माझ्या कॅरेक्टरविषयी बोलणे योग्य होणार नाही. ' विशाल भारद्वाज सोबतचा हा शाहीदचा तिसरा चित्रपट असून यापूर्वी कमिने, हैदर या चित्रपटांत त्याने काम केले आहे. शाहीदचा हेवी बिअर्ड लुक रंगूनसाठी आकर्षक बाब ठरत आहे. शानदारच्या प्रमोशनदरम्यानही त्याचा लुक असाच होता.