पाहा, तैमूर अली खानचे काही सुपर क्यूट फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST
आज २० डिसेंबर म्हणजे, तैमूर अली खान याचा बर्थ डे. जन्मापासूनच तैमूर सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. आज तैमूर आपला पहिला वाढदिवस साजरा करतो आहे. तैमूरच्या वाढदिवशी पाहू या त्याचे काही खास फोटो...
पाहा, तैमूर अली खानचे काही सुपर क्यूट फोटो!
आज २० डिसेंबर म्हणजे, तैमूर अली खान याचा बर्थ डे. जन्मापासूनच तैमूर सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे. आज तैमूर आपला पहिला वाढदिवस साजरा करतो आहे. तैमूरच्या वाढदिवशी पाहू या त्याचे काही खास फोटो...तैमूर जन्मला, त्याच्या नावाची घोषणा झाली आणि याचसोबत त्याच्या नावावरून कॉन्ट्रोवर्सी सुरु झाली होती. गेल्या वर्षभरात तैमूर सगळ्यांचा आवडता बनला. त्याचे निळे डोळे, गोबरे गाल पाहून कुणीही त्याच्या प्रेमात पडेल, हे नक्की. तैमूरचा कुठलाही फोटो येवो तो काहीच क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होतो. तैमूरची लोकप्रीयता इतकी आहे की, त्याच्यासमोर शाहरूख आणि सलमानचे स्टारडमही फिके पडते. सैफच्या कडेवरचा तैमूरचा हा फोटो दृष्ट लागण्याइतका क्यूट आहे. मम्मासोबत तैमूर नेहमीच दिसतो. मीडियापासून त्यांनी तैमूरला कधीही लपवले नाही. तैमूर मम्मीसारखा दिसतो. विशेषत: त्याची स्माईल मम्मासारखी आहे, यात काहीही शंका नाही. तैमूरची स्टाईल आत्तापासूनच युनिक आहे. त्याच्या चेहºयावरचे नवाबी तेजही तसेच आहे.