Join us

'ए जेंटलमॅन'मधला सिद्धार्थ मल्होत्राचा लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 16:40 IST

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसच्या आगामी चित्रपट 'ए जेंटलमॅन'मधले सिद्धार्थचे फार्स्ट लूक आऊट झाले आहे. या फोटोत सिद्धार्थ सुंदर ...

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिसच्या आगामी चित्रपट 'ए जेंटलमॅन'मधले सिद्धार्थचे फार्स्ट लूक आऊट झाले आहे. या फोटोत सिद्धार्थ सुंदर आणि सुशील अंदाजात दिसतो आहे. सिद्धार्थ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. ज्यात सिद्धार्थने क्रिम रंगाची पँट आणि आकाशी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. हा एक कॉमेडी अॅक्शन चित्रपट आहे.‘गो गोवा आॅन, शोर इन सिटी’ या चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेले राज आणि डीके या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. हा फोटो बघून सिद्धार्थचा चित्रपटातील भूमिकेचा अंदाजा बांधता येऊ शकतो. आता नेमकी यात जॅकलिन कोणती भूमिका साकारते हे आहे हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आधी या चित्रपटाचे नाव रिलोडेड ठेवण्यात आले होते. ज्यानंतर ते बदलून 'ए जेंटलमॅन' करण्यात आले. हा चित्रपट ऋतिक रोशन आणि कॅटरिना कैफच्या बँग-बँक चित्रपटाचा सीक्वल आहे मात्र चित्रपटाची टीम यागोष्टीला नकार देते आहे. 25 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कदाचित उद्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीजर लाँच होण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ गौरव नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे ज्याला काव्या नावाच्या मुलीशी लग्न करायचे असते. काव्यला आयुष्यात एक्साइटमेंट हवी असते. तिला गौरवने जेंटलमॅन होण्यासोबतच आयुष्यात रिस्कसुद्धा घ्यावी अशी काव्याची इच्छा असते. चित्रपटाचा पोस्टर आऊट झाला आहे हा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सिद्धार्थ आपल्याला अय्यारीमध्ये सुद्धा दिसणार आहे. अय्यारीमध्ये सिद्धार्थ सक्सेना नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारतोय.