Join us

​लीजा हेडनचा हा नवा लूक तुम्हाला आवडतो का बघा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 14:58 IST

बॉलिवूड अभिनेत्री लीजा हेडन सध्या बॉलिवूडमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पण याचदरम्यान लीजा अचानक चर्चेत आली आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्री लीजा हेडन सध्या बॉलिवूडमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पण याचदरम्यान लीजा अचानक चर्चेत आली आहे. होय, लीजा सोशल मीडियावर ट्रोल होतेय. आता याला कारण काय तर लीजाचे बदललेले रूप. होय, लीजाने तिचे लूक बदललेय. तिने केस कलर केले आहेत. ब्लॅकऐवजी तिचे केस सोनेरी झाले आहेत. आपल्या या न्यू लूकचे काही फोटो लीजाने सोशल मीडियावर शेअर केलेत.आपला हा लूक चाहत्यांना आवडेल,  असा तिचा अंदाज असावा. पण झाले भलतेच. कदाचित लीजाचा हा नवा अवतार चाहत्यांना आवडला नाही. यानंतर ट्रोलर्स लीजाची चांगलीच खिल्ली उडवतांना दिसले. काहींनी तिला ‘भूतनी’ म्हटले काहींनी ‘बॅड आयडिया’ म्हणून तिच्या केसांचा रंग पाहून नाकं मुरडली. अर्थात काहींनी या लूकसाठी लीजाची तोंडभरून स्तुतीही केली. अनेकांनी तिला हॉट संबोधत तिची तुलना लेडी गागासोबत केली. आता तुम्हाला लीजाचा हा नवा लूक आवडतो की नाही, हे तुम्हीच ठरवा पण आपल्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.‘क्वीन’ आणि ‘शौकीन’ सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणा-या लीजाने गतवर्षी सप्टेंबरमध्ये साखरपुड्याची घोषणा केली होती. यानंतर गतवर्षी २९ आॅक्टोबरला ती बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नानंतर सात महिन्यांनी म्हणजे १७ मे २०१७ रोजी लीजाने मुलाला जन्म दिला होता. जॅक आता पाच महिन्यांचा झाला आहे. अद्याप जॅकचा चेहरा चाहत्यांनी पाहिलेला नाही. पण त्याची झलक मात्र अनेकदा पाहिली आहे.ALSO READ : लीजा हेडन दिसतेय तितकीच हॉट, तितकीच सेक्सी! प्रसूतीनंतर मुलासोबत केले पहिले फोटोशूट!!  लीजाचा पती डिनो हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे. लीजा अखेरीस ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. लीजाने  आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.    तूर्तास लीजा बाळाच्या संगोपणात व्यक्त आहे.