Join us

​का संतापली लीजा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 13:33 IST

बॉलिवूडची ‘बोल्ड’ अभिनेत्री लीजा हेडन सध्या जाम संतापली आहे. अगदी अलीकडे लीजा तिचा बॉयफ्रेन्ड डिनो लालवानी याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. ...

बॉलिवूडची ‘बोल्ड’ अभिनेत्री लीजा हेडन सध्या जाम संतापली आहे. अगदी अलीकडे लीजा तिचा बॉयफ्रेन्ड डिनो लालवानी याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. आता नव्या-कोºया लग्नाची नवलाई सोडून नवी-कोरी नवरी अशी का संतापली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तेच आम्ही सांगतोय. लीजा संतापलीय ते एका इंग्रजी दैनिकावर. होय, लग्नानंतर लीजावर चहूबाजुंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने संबंधित इंग्रजी दैनिकाने लीजावर एक लेख प्रकाशित केला. हा लेख वाचला आणि लीजाचे माथे भडकले. कारण?? कारण यात लीजाच्या सासरच्यांना ‘पाकिस्तानी’ संबोधण्यात आले होते. मग काय, लीजाचा संताप अनावर झाला. टिष्ट्वटरवर तिने या संतापाला वाट मोकळी करून दिली. माझे पती भारतीय आहेत. माझे सासरे गुल्लू लालवानी यांचा जन्म भारत-पाक फाळणीपूर्वी झाला होता. फाळणीनंतर त्यांना पाकिस्तानात पाठवले गेले. एका नव्या आयुष्याची सुरुवात करणाºया मुलीला तुम्ही असा लेख लिहून शुभेच्छा देणे, दुर्दैवीच म्हणायला हवे, अशा शब्दांत तिने या दैनिकाचे कान टोचले.लीजा आणि डिनो लग्नापूर्वी वर्षभर रिलेशनशिपमध्ये होते. गत २९ आक्टोबरला थायलंडमध्ये या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे काही फोटो लीजाने सोशल मीडियावर शेअर केले होते. लीजा अलीकडे ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये झळकली. यात तिची छोट्याशा पण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली.