लाईट, कॅमेरा, अॅक्शन फॉर ‘फुकरे २’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 17:43 IST
धम्माल, मजा, मस्ती असा संपूर्ण पॅकेज असलेला २०१३ चा हिट चित्रपट ‘फुकरे’ आठवतोय ना? दिल्लीत नेहरू पॅलेस येथे ‘ ...
लाईट, कॅमेरा, अॅक्शन फॉर ‘फुकरे २’!
धम्माल, मजा, मस्ती असा संपूर्ण पॅकेज असलेला २०१३ चा हिट चित्रपट ‘फुकरे’ आठवतोय ना? दिल्लीत नेहरू पॅलेस येथे ‘फुकरे २’ ची नुकतीच शूटिंग सुरू झाली आहे. ‘फुकरे २’ च्या चित्रीकरणासाठी चित्रपटाची टीमही खुप उत्सुक आहे. त्यांच्याप्रमाणेच दिल्लीतील फुकरे टीमचे फॅन्सही तिथे चित्रीकरण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईट, कॅमेरा, अॅक्शन असा आवाज सेटवर घुमत असल्याने चाहत्यांची गर्दी वाढत आहे. पुल्कित सम्राट, अली फजल, वरूण शर्मा, मंजोत सिंग, रिचा चढ्ढा, विशाखा सिंग आणि प्रिया आनंद या स्टारकास्टसह सर्व जण लाईट, कॅमेरा, अॅक्शन असे म्हणत ‘फुकरे २’ ची शूटिंग सुरू केली आहे. २०१३ चा फुकरे चित्रपट सर्वांत जास्त एंटरटेनिंग चित्रपट म्हणून ओळखला जातो. चित्रपटाचे कथानक आणि भूमिकांची आकर्षित करणारी नावं हे चित्रपटाचे विशेष म्हणता येईल.पुल्कितने या चित्रपटासाठी त्याचे वजन वाढवले होते. आता पुन्हा एकदा तो चित्रपटासाठी खुप उत्साहित आहे. ‘फुकरे २’ साठी त्याने स्पेशल फिटनेसकडे लक्ष दिले आहे. केवळ पुल्कितनेच ‘ फुकरे २’ साठी टोन बॉडी साकारली आहे असे नव्हे तर इतर कलाकारांनीही अस्सल पंजाबी लुकसाठी त्यांच्या लुकसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.