Join us  

JNU नंतर दीपिका नव्या वादात, अ‍ॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्याच वकीलाने केली याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 10:15 AM

छपाकचे प्रदर्शन थांबवण्यासाठी दिल्ली पटियाल हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

दीपिका पादुकोण आणि छपाकच्या मागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस सिनेमा एक रोज नव्या अडचणीत सापडताना दिसतोय. छपाकचे प्रदर्शन थांबवण्यासाठी दिल्ली पटियाल हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका वकील अपर्णा भट्ट यांनी केली आहे. अपर्णा या लक्ष्मीच्या वकील आहेत. 

अपर्णा या सिनेमाच्या निर्मात्यांवर नाराज आहे. निर्मात्यांनी सिनेमात त्यांच्या नावाचा कुठेच उल्लेख केलेला नाही तसेच कुठेच क्रेडिटदेखील देखील दिले नाही. या कारणामुळे त्यांनी सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टात अपर्णा यांनी छपाकची दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि निर्माती दीपिका पादुकोण विरोधात याचिका दाखल केली आहे. अपर्णाने जवळपास 10 वर्षे लक्ष्मीची केस कोर्टात लढली होती आणि जिंकलीसुद्धा. यासाठी त्यांनी कोणतेचे मानधन घेतले नव्हते.  

 

आपल्या याचिकेत त्या म्हणाल्या, ''त्यांनी अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची केस अनेक वर्षे लढली मात्र या सिनेमात मला कुठेच क्रेडिट दिले गेले नाही.'' ऐवढेच नाही तर अपर्णा यांचं म्हणणे आहे की, त्यांनी छपाक सिनेमाच्या स्क्रिप्टसाठी सुद्धा मदत केली होती. छपाकच्या निर्मात्यांनी सिनेमात क्रेडिट देण्याचा विश्वास दिला होता. मात्र असे प्रत्यक्षात झाले नसल्याचे अपर्णा यांचं म्हणणे आहे. जोपर्यंत क्रेडिट लिस्टमध्ये त्यांचे नाव सामिल होत नाही तोपर्यंत सिनेमा रिलीज होऊ देऊ नकाअशी मागणी अपर्णा यांनी केली.

दीपिका पादुकोण हिने मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे दीपिका ट्रोलर्सच्या निशान्यावर आली होती. ऐवढच नाही तर सोशल मीडियावर #BoycottChhapaak नावाचा हॅश टॅग ट्रेंड होत होता. त्यामुळे ऐकूणच दीपिकाच्या मागे लागलेले हे ग्रहण काही संपायचे नाव घेत नाहीय. 

टॅग्स :दीपिका पादुकोणजेएनयूछपाक