‘मुबारकाँ’चा ट्रेलर लाँच सोहळा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST
अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, अथिया शेट्टी यांच्या मुख्य भूमिकेतील ‘मुबारकाँ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुुंबईत अलीकडेच पार पडला. या सोहळ्याप्रसंगी चित्रपटातील कलाकारांचा हटके अंदाज दिसून आला.
‘मुबारकाँ’चा ट्रेलर लाँच सोहळा...
अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ, अथिया शेट्टी यांच्या मुख्य भूमिकेतील ‘मुबारकाँ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुुंबईत अलीकडेच पार पडला. या सोहळ्याप्रसंगी चित्रपटातील कलाकारांचा हटके अंदाज दिसून आला.अनिल कपूरने अथिया शेट्टी हिच्यासोबत या सोहळ्याला एन्ट्री घेतली. अनिल कपूरचा हा हॅण्डसम अंदाज कुणालाही प्रेमात पाडेल. पंजाबी मुंडा अर्जुन कपूर याचा हा असा लूक लक्षवेधी ठरला. अथिया शेट्टीचा कूल अंदाज पाहण्यासारखा होता. अर्जुन कपूर या चित्रपटात दुहेरी भूमिकेत असून त्याने अथियासोबत एक फोटो क्लिक केला. दाक्षिणात्य अभिनेत्री इलियाना डिक्रूझ ही पांढऱ्या रंगाचा टॉप आणि फ्लोरल प्रिंट स्कर्टमध्ये येथे आली होती. अर्जुनने पंजाबी भांगडयासह या सोहळ्याची रंगत वाढवली. स्टेजवर पोहोचताच अर्जुन कपूर आणि अनिल कपूर यांनी असा पंजाबी स्टाईलमध्ये भांगडा करून सर्वांचे मन जिंकून घेतले. मुबारकाँ चित्रपटाची संपूर्ण टीम या सोहळयाला उपस्थित होती. चाहत्यांसोबत संवाद साधताना चित्रपटाची टीम.