लता मंगेशकर विचारतायेत... हा तन्मय भट कोण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 17:17 IST
तन्मय भटने ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटर सचिन तेंडूलकरवर केलेल्या टिपण्णीमुळे सध्या तो चांगलाच वादात अडकला आहे. तन्मयने ...
लता मंगेशकर विचारतायेत... हा तन्मय भट कोण आहे?
तन्मय भटने ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि क्रिकेटर सचिन तेंडूलकरवर केलेल्या टिपण्णीमुळे सध्या तो चांगलाच वादात अडकला आहे. तन्मयने केलेल्या टिपण्णीबाबत लता मंगेशकर यांनी खूपच इंटरेस्टिंग उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी हा व्हिडिओ पाहिलेला नाही आणि हा व्हिडिओ पाहाण्याची माझी इच्छाही नाही. एवढेच नव्हे तर हा तन्मय भट कोण आहे हेदेखील मला माहीत नाही असे उत्तर लता मंगेशकर यांनी दिले आहे.