Join us

​संजूबाबाने कैद्यांसाठी सोडला शेवटचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 10:42 IST

‘गुड आफ्टरनून भाई लोग, आप जब तक कनेक्ट होंगे, तब तक तूम लोगों के लिये यह लास्ट मॅसेज छोड ...

‘गुड आफ्टरनून भाई लोग, आप जब तक कनेक्ट होंगे, तब तक तूम लोगों के लिये यह लास्ट मॅसेज छोड के मैं जा चूका रहुँगा. खूश रहना..साथ रहना...जुर्म करके किसी का भी भला नहीं हुआ..सच्चाई के राह पर चलना भाई लोग..’हा संजय दत्तने येरवडा कारागृहातील खासगी रेडिओ स्टेशनवरून दिलेला शेवटचा संदेश. उद्या गुरुवारी संजू बाबा तुरुंगातून मुक्त होत आहे. बुधवारची दुपार या कारागृहातील त्याची शेवटची दुपार होती. याच दुपारी येरवडा जेलमधील खासगी रेडिओ स्टेशनसाठी संजूबाबाबने शेवटचा रेडिओ शो रेकॉर्ड केला. हा शो संजय तुरुंगातून सुटल्यावर २५ फेबु्रवारीला प्रसारित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संजूबाबा तुरुंगातला लोकप्रीय रेडिओ जॉकी बनला होता.