Join us

कुणासाठी बनतेय फराह खान प्रेरणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 16:37 IST

तुम्ही विचार कराल फराह खान आणि प्रेरणा कुणाची? दिग्दर्शनाचे क्षेत्र सोडून ती काय करतेय? असे तुम्हाला वाटेल. पण, जरा ...

तुम्ही विचार कराल फराह खान आणि प्रेरणा कुणाची? दिग्दर्शनाचे क्षेत्र सोडून ती काय करतेय? असे तुम्हाला वाटेल. पण, जरा थांबा... इतर कुठलाही काही विचार करण्याअगोदर हे जाणून घ्या की, ती कोणाची तरी प्रेरणा ठरते आहे. कॅन्सरच्या रूग्णांच्या पाठीशी उभी राहून ती त्यांना ‘कॅन्सर योद्धे’ म्हणत त्यांचा गौरव करते आहे. कॅन्सर झाला की आयुष्य संपलं म्हणून रूग्ण हताश होतात. पण, या रोगाला घाबरून न जाता कॅन्सरवर मात करा असा संदेश ती रूग्णांना देत आहे. ती नुकतीच ‘लाईफ आफ्टर कॅन्सर’ या कार्यक्रमाठिकाणी आली असता तिने कॅन्सरच्या रूग्णांशी संवाद साधला.त्यावेळी बोलताना ती म्हणते,‘तुम्ही कॅन्सर रूग्ण स्वत:ला मानता. पण आतापासून ही संकल्पना बदलून तुम्ही ‘कॅन्सर योद्धे’ आहात हे तुमच्या मनात बिंबवा. आम्ही कलाकारांनी तुम्हा सर्वांकडून बरंच काही शिकण्याची गरज आहे.’