क्रिती सॅननने खरेदी केली ८० लाखाची अलिशान कार; एक चित्रपटासाठी स्विकारते इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 16:01 IST
बॉलिवूड स्टार क्रिती सॅननने आॅडीची ‘आॅडी क्यू७’ ही कार खरेदी केली आहे. आॅडी इंडियाचे प्रमुख राहिल अंसारी यांनी स्वत: ...
क्रिती सॅननने खरेदी केली ८० लाखाची अलिशान कार; एक चित्रपटासाठी स्विकारते इतके कोटी!
बॉलिवूड स्टार क्रिती सॅननने आॅडीची ‘आॅडी क्यू७’ ही कार खरेदी केली आहे. आॅडी इंडियाचे प्रमुख राहिल अंसारी यांनी स्वत: क्रितीचे घर गाठत कारची डिलिव्हरी दिली. त्याचबरोबर तिच्याकडे ‘आॅडी क्यू७’ची चावी सुपूर्द केली. कार खरेदी केल्याबद्दल क्रितीने सांगितले की, ‘मी ही अलिशान कार खरेदी करण्यास खूप उत्साहित आहे. कारमध्ये फेरफटका मारण्यासाठी मी उतावीळ झाली आहे. तर आॅडी इंडियाचे प्रमुख राहिल अंसारी यांनी सांगितले की, किर्ती सॅनन आॅडी परिवाराचा भाग बनल्यामुळे आम्ही उत्साहित आहोत. आॅडी तरुणांचा ब्रॅण्ड आहे. त्यामुळे क्रितीची ही निवड अगदी बरोबर आहे. दरम्यान या कारची किंमत ८० लाख इतकी असून, क्रिती एका चित्रपटासाठी ३.२ कोटी रूपये चार्ज करते. तिचे नेटवर्थ १२.५ कोटी रूपये आहे. दरम्यान, आॅडी इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर क्रितीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये आॅडी इंडियाचे प्रमुख राहिल अंसारी दिसत आहेत. क्रितीच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल सांगायचे झाल्यास, तिने खूपच कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत तिने बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले केले. परंतु यातील मोजकेच चित्रपट प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकले असले तरी, क्रितीच्या भूमिकेचे मात्र सर्वत्र कौतुक केले गेले. क्रिती तिच्या लव्ह लाइफमुळेही चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याबरोबर तिचे अफेअर असल्याची चर्चा आहे. बºयाचदा हे दोघे एकत्र बघावयास मिळाले आहेत. क्रितीने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर तिने शाहरूख खान, वरुण धवन आणि काजोल यांच्याबरोबर ‘दिलवाले’ या चित्रपटात काम केले. पुढे २०१७ मध्ये ती ‘राब्ता’ आणि आयुष्यमान खुराणासोबत ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात झळकली.