Join us

कृति सेननचे ब्राइडल फोटोशूट व्हायरल, पाहा तिचे हे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:00 IST

कृतिने भविष्यात जेव्हा लग्न करेन तेव्हा अशाच प्रकारे नटायला आवडेल. खरंच सगळं काही खूप स्वप्नवत माझ्यासाठी असे सांगितले आहे.

अभिनेत्री कृति सेननने  इंस्टाग्राम अकाउंटवर आपले फोटोशूट पोस्ट केले आहेत. 'इंडिया टुडे ग्रुप'साठी केलेल्या या फोटोशूटमध्ये ती ब्राइडल लूकमध्ये दिसत आहे. कृतिचा समर ब्राइड लुक पाहताच चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. खास या फोटोशूटसाठी कृतिने  तरुण तहिलियानीचे लेटेस्ट कलेक्शन परिधान केले आहे. तर दुस-या एका फोटोत तिने फ्लोरल डिजाइन  असलेला फलकनुमा लहेंगा परिधान केला आहे. या लेहंग्यामध्ये कृतिचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. तसेच कृतिने भविष्यात जेव्हा लग्न करेन तेव्हा अशाच प्रकारे नटायला आवडेल. खरंच सगळं काही खूप स्वप्नवत माझ्यासाठी असे सांगितले आहे. 

तिच्या या फोटोशूटने सा-यांचे लक्ष तिने वेधले आहे. कृतिने 'लुका छिपी', 'कलंक' आणि 'अर्जुन पटियाला' यासरख्या सिनेमात झळकली होती. तसेच 'हाउसफुल 4' आणि 'पानीपत' सिनेमातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.हाउसफुल 4 या सिरिजची सगळ्यात महागडी सिरीज असणार आहे. यापूर्वी तिन भाग सिनेमाचे सुपरहिट ठरले होते.साजिद नाडियाडवाला या सिनेमाचे निर्माता असून त्याने या सिनेमसाठी कोणतीच कसर सोडलेली नाही. 'हाउसफुल 4' हा एक मल्टीस्टारर सिनेमा असून  अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृति सेनन, कृति खरबंदा, पूजा हेगड़े, चंकी पांडे, राणा दग्गुबाती, अमांदा रोसारियो, बोमन ईरानी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 

आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे. कृति ही खासकरून तिच्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळेही लोकप्रिय आहे. अनेक तरूणी तिला फॉलो करतात.कृति फिगर मेंटेन ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएटसोबत स्ट्रिक्ट फिटनेस रूटीन फॉलो करते. कृति सुंदर असण्यासोबतच हेल्दी आणि फिटही आहे. फिगर स्लिम आणि फिट ठेवण्यासाठी तिच्या दिवसाची सुरुवात व्यायामाने होते. कृतिच्या वर्कआऊटमध्ये डान्स, योगाभ्यास, धावणे आणि पिलेट्स यांचा समावेश आहे. डान्स केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. ती दिवसातून तीनदा वर्कआऊट करते. 

टॅग्स :क्रिती सनॉन