Join us  

रणवीर सिंगने सारा अली खानबद्दल केला आश्चर्यकारक खुलासा, वाचा काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 11:20 AM

ताजी बातमी खरी मानाल तर ‘सिम्बा’च्या सेटवर रणवीर सिंग आणि सारा अली खानची मैत्री चांगलीच बहरली आहे. दोघेही एकमेकांचे ब्रेस्ट फ्रेन्ड झाले आहेत.

रणवीर सिंग आणि सारा अली खान ‘सिम्बा’ या चित्रपटात आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहेत. दोघांचेही सेटवरचे फोटो, व्हिडिओ बघता दोघांचीही आॅनस्क्रीन केमिस्ट्री पडद्यावर आग लावणार असे मानले जात आहे. ताजी बातमी खरी मानाल तर ‘सिम्बा’च्या सेटवर सारा आणि रणवीरची मैत्री चांगलीच बहरली आहे. दोघेही एकमेकांचे ब्रेस्ट फ्रेन्ड झाले आहेत.रणवीर सिंग अलीकडे अक्षय कुमारसोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये आला होता. या शोमध्ये रणवीरने अनेक खुलासे केलेत. यापैकीचं एक खुलासा सारा अली खानबद्दल होता. ‘तुझ्यानुसार, इंडस्ट्रीत असा कुठला कलाकार आहे, ज्याचे खोटे पकडणे कठीण आहे?’, असा सवाल करणने रणवीरला केला होता. यावर मागचा पुढचा कुठलाही विचार न करता, रणवीरने सारा अली खानचे नाव घेतले. माझ्यासाठी ती सारा अली खान आहे. तिचे खोटे तुम्ही पकडूचं शकत नाही. ज्या आत्मविश्वासाने ती तुमच्यासोबत बोलते की, तुमच्यासोबत काही चुकीचे होतेय, याचा अंदाजही तुम्ही बांधू शकत नाही, असे रणवीर म्हणाला. साहजिकचं रणवीरचे हे उत्तर ऐकून करण जोहर अवाक झाला. करण जोहरला साराचा बॉलिवूडमधील मेंटॉर म्हणून ओळखले जाते.‘सिम्बा’ हा चित्रपट यावर्षीच्या अखेरिस रिलीज होणार आहे. सारा अली खानचा ‘सिम्बा’ हा दुसरा चित्रपट असणार आहे. कारण ‘सिम्बा’च्या रिलीजपूर्वी अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’मधून तिचा डेब्यू होणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंग साराच्या अपोझिट आहे. हा चित्रपट येत्या ७ डिसेंबरला रिलीज होतोय.

टॅग्स :रणवीर सिंगसारा अली खानकॉफी विथ करण 6