Join us  

ती मैत्रिण नाही, माझी गर्लफ्रेन्ड! वरूण धवनने दिली नताशा दलालसोबतच्या नात्याची कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 9:55 AM

होय, वरूण धवन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. विशेष म्हणजे, हे बी-टाऊनमधील गॉसिप्स नसून कन्फर्म बातमी आहे.

वरूण धवनच्या फिमेल फॅन्सचे हार्ट ब्रेक करणारी एक बातमी  आहे. होय, वरूण धवन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. विशेष म्हणजे, हे बी-टाऊनमधील गॉसिप्स नसून कन्फर्म बातमी आहे. खुद्द वरूणने हा खुलासा केला आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये वरूण आपल्या लग्नाबद्दल बोलला. मी लवकरच लग्न करतोय, हे त्याने सांगितले. केवळ इतकेच नाही तर नताशा दलाल ही आपली गर्लफ्रेन्ड आहे, हेही वरूणने जाहिर केले. नताशा ही वरुणची बालपणीची मैत्रिण आहे. अलीकडे वरूण व नताशा अनेकदा एकत्र दिसले आहेत. वरुणच्या घरच्या सगळ्या इव्हेंटला नताशा व तिचे कुटुंब हजर असते. एकंदर काय तर वरूण व नताशा या दोघांच्या नात्यावर दोन्ही कुटुंबांनीही पसंतीची मोहोर लावली आहे. धवन व दलाल दोन्ही कुटुंब या नात्यापासून आनंदी आहेत. आता हे नाते पती-पत्नीच्या नात्यात बदलण्यास तयार आहे. आता केवळ तारीख जाहिर होण्याची देर आहे. मध्यंतरी नताशा व वरूण यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. वरूण आपल्या बिझी शेड्यूलमुळे नताशाला वेळ देऊ शकत नव्हता आणि यामुळे दोघांमध्येही काहीकाळ मतभेद निर्माण झाले होते. पण हे मतभेद लगेच मिटले आणि नताशा व वरूण पुन्हा एकत्र आलेत. 

वरुणच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर तो 'कलंक'मध्ये तो आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर , सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितबरोबर दिसणार आहे. अभिषेक वर्मन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमात 1940 च्या दशकातील कहाणी दाखविली जाणार आहे.

टॅग्स :वरूण धवनकॉफी विथ करण 6