Join us  

काय आहे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं डार्कनेट कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 9:44 AM

NCB आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं डार्कनेट कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून संकेत मिळतो की, रियाला ड्रग्सची चांगली ओळख आहे.

रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सअ‍ॅप चॅटींगमधून समोर आले आहे की, ती कथितपणे ड्रग्सचं सप्लाय करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होती. आणि तिने कथितपणे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ड्रग्स देण्यासाठी संपर्क ठेवला. ड्रग्स अ‍ॅंगल समोर आल्यानंतर सीबीआय आणि ईडीससोबतच आता Narcotics Control Bureau (NCB) सुद्धा सुशांतच्या मृत्यूचा तपास करत आहे.

सुशांतच्या मृत्यूचं डार्कनेट कनेक्शन

NCB आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं डार्कनेट कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून संकेत मिळतो की, रियाला ड्रग्सची चांगली ओळख आहे. सोबतच रियाला ड्रग्सच्या प्रभावाबाबतही माहीत आहे. चॅटमधून असेही संकेत मिळतात की, रियाला ड्रग्स घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोडवर्डची सुद्धा माहिती आहे. 

तसेच  हेही समोर येतं की, २०१७ पासूनच रिया चक्रवर्ती नशेचे पदार्थ जसे की, वीड, मारिजुआना, सीबीडीचा वापर करत होती. रिया आणि सॅम्युअल यांच्यात १७ एप्रिल २०२० आणि १ मे २०२० रोजी झालेल्या संवादातून हे सिद्ध होतं की, १७ हजार रूपयांची वीड खरेदी रियाचा भाऊ शौविद चक्रवर्तीने केली आहे. रिया आणि टॅलेंट मॅनेजर जया शाह यांच्यात १५ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या संवादातून दिसतं की, रियाला जया साहाने सीबीडी नावाचं ड्रग्स दिलं होतं. जे सुशांतला कॉफीमध्ये मिक्स करू दिलं जाणार होतं.

NCB च्या चौकशीतून आतापर्यंत काय खुलासे

१) डार्कनेटच्या माध्यमातून मागवली जात होती ड्रग्स२) रिया चक्रवर्ती ज्या पॅडलरकडून ड्रग्स घेत होती, ते डार्कनेटच्या माध्यमातून परदेशातून ड्रग्स मागत होते३) गुन्हे विश्वातील सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आहे डार्कनेट४) ड्रग्स, कॉन्ट्रॅक्ट किलिंगसहीत कोणत्याही घटनेसाठी डार्कनेटवर साहीत्य मिळतं५) सुशांतच्या मृत्यूत डार्कनेट कनेक्शनबाबत करत आहे तपास६) जगातले केवळ ४ टक्के लोकच या इंटरनेट स्पेसचा वापर करतात, ९४ टक्के स्पेस डार्कनेट किंवा डीप डार्कनेटमध्ये वापर होतो७) डार्कनेटच्या माध्यमातून फेक आयडी तयार करून गुन्हा करण्यासंबंधी कोणत्याही वस्तू मागितल्या जातात८) आयडी फेक राहत असल्याने आरोपी पर्यत पोहोचणं अवघड असतं

दोन ड्रग्स पॅडलर्सना अटक

दरम्यान, सुशांत केसमध्ये समोर आलेल्या ड्रग अ‍ॅंगलचा तपास करण्यासाठी NCB ची दिल्लीहून मुंबईला आली आहे. NCB चे डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा आणि त्यांच्या टीमने दोन अशा पॅडलर्सना अटक केलीये, जे मुंबईतील हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये वापरली जाणारी ड्रग सप्लाय करत होते. NCB ने करन अरोरा आणि अब्बास या दोघांना अटक केलीये. एनसीबीनुसार, हे दोघे डार्कनेटच्या माध्यमातून परदेशातून ड्रग्स मागवत होते. हे ड्रग्स कुरिअर किंवा इंटरनॅशनल पोर्टच्या माध्यमातून मुंबईत येत होते.

हे पण वाचा :

सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता

बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर

सुशांतच्या खात्यात होते 70 कोटी, रिया व तिच्या कुटुंबावर 50 लाखांची उधळपट्टी!

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती