Join us  

कशी झाली होती नदीम-श्रवण यांची पहिली भेट? मजेदार आहे किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:16 AM

Nadeem–Shravan : नदीम-श्रवण 18-19 वर्षांचे असताना त्यांची गट्टी जमली होती. कॉलेजातच त्यांची मैत्री झाली होती.

ठळक मुद्देआशिकी पर्यंत पोहोचायला या बॅनरला 17 वर्षे वाट पाहावी लागली होती.

‘आशिकी’ या सिनेमांच्या गाण्यांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या नदीम-श्रवण (Nadeem–Shravan) या जोडीतील श्रवण राठोड आज आपल्यात नाहीत. काल गुरुवारी कोरोनामुळे त्यांनी अंतिम श्वास घेतला. नदीम-श्रवण या जोडीने एक काळ गाजवला. एकेकाळी बॉलिवूडमध्ये फक्त याच जोडगोडीची गाणी वाजायची.  गुलशन कुमार हत्याकांडात नदीम सैफीचे नाव आल्यानंतर ही जोडी दुंभगली होती. आता तर श्रवण यांच्या निधनाने ही जोडी कायमची तुटली. (Shravan Kumar Rathod passes away) 

18-19 वर्षांचे असताना जमली होती गट्टीनदीम-श्रवण 18-19 वर्षांचे असताना त्यांची गट्टी जमली होती. कॉलेजातच त्यांची मैत्री झाली होती. याच वयात दोघांना संगीतकार म्हणून पहिली संधी मिळाली होती. या जोडीचा पहिला सिनेमा होता ‘दंगल’. हा एक भोजपुरी सिनेमा होता. या सिनेमाची गाणी आजही लोेकप्रिय आहेत. कासी हिले पटना, हिले कलकत्ता हिलेला, तोहरी लचके कमरिया सारी दुनिया हिलेला हे या सिनेमाचे गाणे तुफान गाजले.

अशी झाली होती पहिली भेट...नदीम व श्रवण यांची पहिली भेट कशी झाली होती, हे खुद्द श्रवण यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, मी लाला लजपतराय कॉलेजात होतो आणि नदीत एलफिंस्टन कॉलेजात़ हरीश नामक एक मुलगा श्रवण यांच्या वडिलांकडे संगीत शिकायचा. तो सुद्धा एलफिंस्टन कॉलेजात होता. एकदा एलफिंस्टन कॉलेजात काही कार्यक्रम होता. हरीशने या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण दिले होते. याच कार्यक्रमात मी पहिल्यांदा नदीमला भेटलो होते. 1972 सालची ही घटना. त्यादिवशी नदीम श्रवण यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले होते आणि पुढे काही काळानंतर नदीम-श्रवण बॅनर लॉन्च केले होते. अर्थात आशिकी पर्यंत पोहोचायला या बॅनरला 17 वर्षे वाट पाहावी लागली होती. 

टॅग्स :बॉलिवूड