Join us  

Nisha Kothari : कुठे आहे राम गोपाल वर्माची 'हिरोईन' निशा कोठारी? इतक्या वर्षानंतर ओळखणंही कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 8:00 AM

Nisha Kothari : 'जेम्स' आणि 'द किलर' सारख्या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी निशा कोठारी आज रूपेरी पडद्यावरून पूर्णपणे गायब झाली आहे. २०११ पासून बॉलिवूडच्या एकाही सिनेमात ती दिसलेली नाही...

बॉलिवूडमध्ये काही लोक रातोरात स्टार बनतात तर काही लोक सिनेमा फ्लॉप होताच इंडस्ट्रीतून नकळत बाहेर फेकले जातात. २००५ मध्ये 'सरकार' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी निशा कोठारी अशीच एक कमनशीबी म्हणावी अशी अभिनेत्री. निशा कोठारीच्या नशीबानं अचानक अशी काही पलटी मारली की, काही काळानंतर लोकांनी तिच्याबाबत विचारणंही बंद केलं. 'जेम्स' आणि 'द किलर' सारख्या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी निशा कोठारी आज रूपेरी पडद्यावरून पूर्णपणे गायब झाली आहे. २०११ पासून बॉलिवूडच्या एकाही सिनेमात ती दिसलेली नाही. आपल्या ६ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये तिने मोजून १० सिनेमे केलेत आणि यापैकी ८ सिनेमे रामगोपाल वर्माचे होते.

निशा कोठारीचं खरं नाव प्रियंका कोठारी आहे. चित्रपटांसाठी तिने निशा कोठारी हे नवं नाव धारण केलं. पश्चिम बंगालमध्ये ३० नोव्हेंबर १९८३ रोजी जन्मलेली निशा १० वीत शिकत असताना तिचे कुटुंब दिल्लीत शिफ्ट झालं. निशाचे वडील केमिकल बिझनेसमॅन होते. लेकीनेही याच बिझनेसमध्ये यावं, अशी त्यांची इच्छा होती. पण निशाला ॲक्टिंग करायची होती. कॉलेज पूर्ण होताच निशाने ॲक्टिंग क्लासेस ज्वॉईन केलेत. वडिलांचा याला प्रचंड विरोध होता. पण निशाने हार मानली नाही. मग एकदिवस तिला मॉडेलिंगची ऑफर आली. पाठोपाठ एक जाहिरातही चालून आली. फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांनी तिला नाव बदलण्याचा सल्ला दिला आणि तिने निशा कोठारी हे नवं नाव स्वीकारलं. निशाचे वडील यामुळे प्रचंड संतापले होते. खुद्द निशा सुद्धा नाव बदलण्याच्या निर्णयावर खूश नव्हती.

'चढती जवानी मेरी चाल मस्तानी' च्या रीमिक्स गाण्यामुळे प्रियांकाला ओळख मिळाली होती. आर. माधवनमुळे तिला २००३ मध्ये तमिळ सिनेमा जय जय मध्ये ब्रेक मिळाला. हिंदी सिनेमात तिला पहिला ब्रेक राम गोपाल वर्माने दिला होता.  'शिवा', 'डरना जरूरी है', 'गो', 'डार्लिंग', 'आग', 'अज्ञात', 'बिन बुलाए बाराती' सारख्या सिनेमात ती दिसली. त्यासोबत ती अनेक तेलगु आणि तमिळ सिनेमांमध्येही दिसली होती. पण तिला काही खास ओळख मिळू शकली नाही.

२०१६ मध्ये निशाने दिल्लीच्या एक बिझनेसमनसोबत लग्न केलं. अर्थात तिचा पती काय करतो, कसा दिसतो हे याबद्दल कुठलीही माहिती नाही. लॉकडाऊन दरम्यान निशाच्या पतीचं कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी आली होती. मात्र याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही.  निशा अखेरची २०१६ मध्ये आलेल्या बुलेट रानी सिनेमात दिसली होती. हा सिनेमा कन्नड आणि तेलुगू भाषेत रिलीज झाला होता. पण हा सिनेमा कधी आला कधी गेला, हेही कळलं नाही.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीराम गोपाल वर्मा