Join us

सुवर्ण मंदिरात दर्शनार्थींसाठी ऐशने केला स्वयंपाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 08:58 IST

सबरजीत या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी अमृतसरला पोहचलेल्या ऐश्वर्या राय-बच्चनने सुवर्ण मंदिराला भेट दिली. तिने मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि त्यानंतर ...

सबरजीत या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी अमृतसरला पोहचलेल्या ऐश्वर्या राय-बच्चनने सुवर्ण मंदिराला भेट दिली. तिने मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि त्यानंतर ती चक्क लंगरमध्ये जाऊन भांडी घासली. पंजाबी ड्रेस घालून ऐश्वर्याने सुवर्ण मंदिरात प्रवेश केला. ‘गुरू ग्रंथ साहिब’चे दर्शन घेतल्यानंतर ती लंगरमध्ये दाखल झाली. येथे तिने दर्शनार्थींसाठी तयार करण्यात येणा-या जेवणासाठी मदत केली. सोबतच येथील फरशीही स्वच्छ केली. सबरजीत या चित्रपटाच्या शुटिंगसाठी हे काम तिने केले असे सांगण्यात येत आहे.दुपारनंतर सुरू झालेल्या शूटींग सिन्समध्ये ऐश्वर्यावर लंगरमध्ये भांडी घासताना, फरशी साफ करताना आणि जेवण शिजवतानाचे सिन्स शूट करण्यात आले. उमंग कुमार दिग्दर्शन करीत असलेला हा चित्रपट हा पंजाबमधील शेतकरी सरबजीतच्या आयुष्यावर आधारित आहे. ऐश्वर्या राय बच्चन या चित्रपटात ती सरबजीत सिंगची बहिण दलबीर कौरची भूमिका करीत आहे. यासाठी ग्लॅमरपासून दूर जात ती अतिशय साधा मेकअप करणार आहे.उमंग कपूर दिग्दर्शन करीत असलेल्या या चित्रपटात ऐश्वर्यासोबत रणदीप हुडा सरबजीतची भूमिका करणार आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर हे शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे येणारा प्रत्येक भाविक अतिशय भक्तीभावाने सेवा अर्पण करतो हे विशेष.