Join us  

किशोर कुमार यांच्या ‘या’ चित्रपटावर कोर्टाने घातली होती बंदी, आता 60 वर्षानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 12:17 PM

आणि चमत्कार झाला...

ठळक मुद्दे1957 मध्ये रिलीज झालेला ‘बेगुनाह’ हा सिनेमा रिलीज होताच वादात सापडला होता.

सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांच्या एका चित्रपटावर कोर्टाने बंदी घातली होती. आता सुमारे 60 वर्षांनंतर याच चित्रपटाची रिळ सापडली आहे. होय, या चित्रपटाचे दुर्मिळ रिळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या  (एनएफएआय) हाती लागले. 1957 साली किशोर कुमार यांचा ‘बेगुनाह’ या सिनेमावर कोर्टाने बंदी लादली होती. या चित्रपटाचे सर्व प्रिंट्स नष्ट करण्याचे आदेश बॉम्बे हायकोर्टाने दिले होते. पण याऊपरही  या चित्रपटाची दोन रिळे एनएफएआयच्या हाती लागली आहेत. इतक्या वर्षांनंतर या प्रिंट्स मिळाल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गत आठवड्यात मिळालेल्या ‘बेगुनाह’च्या या दुर्मिळ क्लिपमध्ये अभिनेत्री शकीला डान्स करताना दिसतेय तर म्युझिक कंपोझर जयकिशन पियानो वाजवता दिसत आहे आणि मागे ‘ऐ प्यासे दिल बेजुबां’ गाणे वाजत आहे.

एनएफएआयचे डायरेक्टर प्रकाश यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, अनेक लोक कित्येक वर्षांपासून हे रिळ शोधत होते. आमच्याकडे ही रिळ नव्हती. आम्हीही या रिळच्या शोधात होतो. अशात ही रिळ सापडली. हा एक चमत्कार आहे.म्युझिक कंपोजर शंकर-जयकिशन यांचे चाहते दीर्घकाळापासून या सिनेमाच्या रिळच्या शोध घेत होते. याचे कारण म्हणजे, यात जयकिशन यांची भूमिका होती. त्यांची भूमिका असलेला हा एकमेव सिनेमा आहे. एनएफएआयला  दोन रिळ मिळाल्या आहेत. त्या सुमारे 60 ते 70 मिनिटांच्या आहेत. दुसºया रिळमध्ये ‘ऐ प्यासे दिल बेजुबां’ गाणे आहे. या गाण्यात जयकिशन व शकीला आहेत. या गाण्याला मुकेश यांनी आवाज दिला आहे. रिळ अंत्यंत खराब अवस्थेत आहेत. पण गाणे ऐकू येतेय.

का लादली होती बंदी1957 मध्ये रिलीज झालेला ‘बेगुनाह’ हा सिनेमा रिलीज होताच वादात सापडला होता. पॅरामाऊंट पिक्चर्स अमेरिकाने हा सिनेमा 1954 मध्ये रिलीज ‘नॉक ऑन वुड’ची कॉपी असल्याचा आरोप करत, न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या प्रकरणात न्यायालयाने पॅरामाऊंट पिक्चर्स अमेरिकाच्या बाजुने निर्णय देत, ‘बेगुनाह’चे सर्व प्रिंट्स नष्ट करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर ‘बेगुनाह’च्या प्रिंट्स नष्ट झाल्यात, असे मानले गेले होते. पण भारतातील सिनेप्रेमींच्या माध्यमातून या सिनेमाच्या प्रिन्ट्स मिळाल्या.

टॅग्स :किशोर कुमारबॉलिवूड