शाहरूख खानचा आगामी चित्रपट ‘फॅन’ हा खरंतर त्याला आत्तापर्यंत प्रेक्षकातुन मिळालेल्या प्रेमाची पावती आहे. या चित्रपटाची विशेष बाब ही की, ‘शाहरूख स्वत: त्याच्या फॅनची भूमिका करणार आहे. किंग खान शाहरूख दिल्लीत ‘फॅन’ चित्रपटाचे शीर्षक गीत ‘जबरा फॅन’ लाँच करण्यासाठी आला असताना प्रेक्षकांनी त्याला ‘फॅन अँथम’ म्हणूनच सादर केले.यावेळी या गाण्यावर शाहरूखने डान्स केला. हा व्हिडिओ जवळपास १५ सेकंदाचा असून यात तो ‘मैं तेरा फॅन हो गया’ गाण्यावर डान्स करताना दिसला. स्टेजच्या समोर प्रचंड गर्दी आणि युवकांनी भारलेल्या वातावरणात त्याने सर्वांना त्याच्यासोबत डान्स करण्याचे आवाहन केले.हे गाणे अत्यंत विचित्र डान्सिंग स्टेप्सचे आहे. शाहरूखला हे गाणे शूट करताना खुप मजा आली. यशराज फिल्म्स च्या बॅनरखाली आदित्य चोप्रा यांच्या निर्मितीतील हा चित्रपट ‘फॅन’ १५ एप्रिलला रिलीज होणार आहे.