Join us

कियाराच्या घरी सुरु झाली लगीनघाई; शेअर केली ‘Good Newwz’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 13:03 IST

या शुक्रवारी कियाराचा ‘गुड न्यूज’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण त्याआधी कियाराने एक गुड न्यूज चाहत्यांशी शेअर केली आहे.

ठळक मुद्देलवकरच कियारा ‘गुड न्यूज’ या सिनेमात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही सध्या यशाच्या शिखरावर आहे. अनेक वर्षे स्ट्रगल केल्यानंतर कियाराला ‘कबीर खान’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा मिळाला आणि जणू तिला लॉटरी लागली. या चित्रपटाने कियाराला एक वेगळी ओळख दिली. या शुक्रवारी कियाराचा आणखी एक सिनेमा ‘गुड न्यूज’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण त्याआधी स्वत: कियाराने एक गुड न्यूज चाहत्यांशी शेअर केली आहे. होय, लवकरच कियाराच्या घरी सनई चौघडे वाजणार आहे. पण थांबा... कियारा लग्न करणार नाहीये, तर तिची बहीण इशिता ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

इशिताचा नुकताच साखरपुडा झाला. कियाराने बहीणचा व तिच्या होणा-या पतीचा फोटो शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्यात. ‘बहीणीला आनंदी पाहण्याइतका आनंद कशातच नाही. तू आमच्या आयुष्यात नवा आनंद घेऊन आला आहेस कर्मा विवान. आमच्या कुटुंबात तुझे स्वागत. तू चांगल्या गुणांनी पास झालास. आमच्या कुटुंबाचा नवा सदस्य. आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा...,’ असे कियाराने बहीण इशिता व तिच्या होणा-या पतीला उद्देशून लिहिले आहे.

 ‘कबीर सिंग’ या चित्रपटात कियाराने प्रीतीची व्यक्तिरेखा साकारली होती. हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. लवकरच कियारा ‘गुड न्यूज’ या सिनेमात दिसणार आहे. या तिच्या आगामी सिनेमा अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत आहेत. यानंतर ‘भूल भूलैया 2’ हा सिनेमा तिने साईन केला आहे. यात ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

 

टॅग्स :कियारा अडवाणी